लोकन्यायालयात परस्पर संमतीने निवाडा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:31 AM2021-09-26T04:31:47+5:302021-09-26T04:31:47+5:30
अर्जुनी मोरगाव : लोकन्यायालयाचा झटपट निकाल लागतो. लोकन्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध अपील नाही. आपसी समझोत्याने निवाडा होत असल्याने कुणाची हार, कुणाचा ...
अर्जुनी मोरगाव : लोकन्यायालयाचा झटपट निकाल लागतो. लोकन्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध अपील नाही. आपसी समझोत्याने निवाडा होत असल्याने कुणाची हार, कुणाचा विजय हा प्रश्न निर्माण होत नाही. एकमेकांतील द्वेष वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही, असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश प्रतीक सोनकांबळे यांनी केले.
स्थानिक न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी निमजे, ॲड. कापगते, ॲड. मोहन भाजीपाले, ॲड. पी.एस.रामटेके, ॲड. एच बी तुळशीकर,ॲड. गौरीशंकर अवचटे, ॲड. रवी केसलकर, ॲड. शहारे, म.रा वीज वितरण, बँक ऑफ बडोदा, भारतीय स्टेट बँक व नगरपंचायतचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. या लोकन्यायालयात तीन दिवाणी, ८ फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यात आली. भारतीय स्टेट बँकेच्या दोन प्रकरणात ४७ हजार रुपये, बँक ऑफ बडोदाच्या तीन प्रकरणात २९ हजार रुपये, महावितरणच्या २९ प्रकरणात १ लक्ष ४७ हजार ५६० तर नगरपंचायतच्या ३२ प्रकरणात १ लक्ष ९० हजार ६७५ रुपयांची समझोत्याने वसुली करण्यात आली. तालुक्यातील ७० ग्रामपंचायतच्या घरकर व पाणीपट्टी कराची ३४०२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन ॲड. बनपूरकर यांनी केले. ॲड. एच.बी.तुळशीकर यांनी आभार मानले.
250921\173-img-20210925-wa0001.jpg
लोकन्यायालयात निवाडा करतांना न्यायाधीश सोनकांबळे व अधिवक्ता मंडळी