कोविड योध्दयांना नुसताच ‘मान’; मानधन थकले अडचणी वाढल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:20 AM2021-07-11T04:20:36+5:302021-07-11T04:20:36+5:30

गोंदिया: कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा अपुरी पडत असल्याने कोरोना काळात काम करण्यासाठी आरोग्य विभागाने कंत्राटी तत्त्वावर आरोग्य ...

Just ‘respect’ Kovid warriors; Honorarium tired problems increased! | कोविड योध्दयांना नुसताच ‘मान’; मानधन थकले अडचणी वाढल्या!

कोविड योध्दयांना नुसताच ‘मान’; मानधन थकले अडचणी वाढल्या!

Next

गोंदिया: कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा अपुरी पडत असल्याने कोरोना काळात काम करण्यासाठी आरोग्य विभागाने कंत्राटी तत्त्वावर आरोग्य विभागात भरती केली होती. कोरोनाच्या काळात मानधनावर ज्यांची भरती करण्यात आली त्यांना आता कोरोना संपल्यामुळे या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांना नुसता मान दिला जात असून त्यांचे मानधन अद्याप मिळाले नसल्याची तक्रार आहे. कोरोना काळात डॉक्टर, ईसीजी तंत्रज्ञ, बीएएमएस डॉक्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा एंट्री ऑपरेटर, औषध निर्माण अधिकारी, परिचारिका या पदावर ९५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. कंत्राटी स्वरूपात भरण्यात आलेल्या या पदांपैकी आता ९० कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी दिली आहे. त्यांना कामावरून कमी करण्यात येत असल्याने त्यांच्यात असंतोषाचे वातावरण आहे. अडचणीच्या काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाचा मोबदला मिळाला नाही त्यामुळे ते अधिकच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अजूनही रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मानधन देऊन नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

....................................................

मान दिल्याने पोट भरत नाही

आम्हाला नियुक्ती देतांना काम नसल्यावर तुमची नोकरी संपुष्टात येईल असा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे अनेकजण खासगी नोकरी करीत आहेत. तर काही जण नोकरीच्या शोधात आहेत. कामावरून कमी झाल्यावर तत्काळ आम्हाला जॉब मिळत नाही ही अडचण आहे.

-एक कंत्राटी परिचारिका

........

कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे भाकीत केले जात असले तरी आरोग्य विभागाने आम्हाला कामावरून कमी करायला सुरुवात केली. कोरोनाच्या संकट काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम ठेवायला पाहिजे होते. सोबतच मानधनही देणे अपेक्षित आहे.

- एक कंत्राटी डॉक्टर

..............

कोरोनाची लाट ओसरली आणि आम्हाला कमी करण्याचा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला. केलेल्या कामाचे मानधन मिळाले नाही. आता रोजगाराच्या शोध सुरू आहे आम्हाला मानधन मिळाले असते तर अडचणी दूर झाल्या असत्या.

- एक कंत्राटी कर्मचारी

............................

कामही नाही; केलेल्या कामाचा मोबदलाही नाही

काम उपलब्ध होताच आवश्यकतेनुसार भरती होईल, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे. काम नसलेल्या कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. तिसऱ्या लाटेमध्ये गरज भासल्यास कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यांना नियुक्ती देतानाच गरजेनुसार कामावर ठेवले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तसा बॉण्ड त्यांच्याकडून लिहून घेण्यात आला होता. जिल्ह्यात सध्या एकही ठिकाणी केंद्र सुरू नाही.

.........................

कोट

शासनाच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांची भरती व त्यांना कामावरून कमी केले जाते. शासनाकडून निधी येताच त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन देण्यात येईल. शासनाने यापूर्वी दिलेला निधी परत मागविला असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन देता आले नाही.

डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा शल्य चिकित्सक गोंदिया.

.......................

कोरोनाच्या काळात मानधनावर घेतलेले कर्मचारी-९५

सद्या कामावर असलेले कर्मचारी-९०

किती कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा- ९०

सद्या सुरू असलेले कोविड केअर सेंटर-००

Web Title: Just ‘respect’ Kovid warriors; Honorarium tired problems increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.