जिल्ह्यात उन्हाने केला कहर
By admin | Published: May 15, 2017 12:15 AM2017-05-15T00:15:41+5:302017-05-15T00:15:41+5:30
सूर्य आता आपला प्रकोप दाखवू लागला असून त्यामुळेच जिल्हयाचे तापमान आता ४२ डिग्रीच्यावर गेल्याची नोंद घेतली जात आहे
तापमान ४२ डिग्रीवर : आणखीही वाढण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सूर्य आता आपला प्रकोप दाखवू लागला असून त्यामुळेच जिल्हयाचे तापमान आता ४२ डिग्रीच्यावर गेल्याची नोंद घेतली जात आहे. मे महिन्यात सर्वाधिक उन्ह तापते. या उन्हामुळे जीव आता कासावीस होऊ लागला असून कधी उन्हाळ््यापासून सुटका मिळते याची वाट सर्वच बघू लागले आहेत. मात्र मे महिना आता जेमतेम अर्ध्यातच आला असून उरलेल्या या १५ दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता टाळता येत नाही.
निसर्गाने उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असे तीन ऋतूंचे चक्र बांधून दिले आहे. मात्र मानवाने आपल्या स्वार्थासाठी निसर्ग नियम धाब्यावर बसविले. याचा ऋतुचक्र व निसर्गावर परिणाम पडत आहे.
झाडांची कत्तल व सिमेंट कॉंक्रीटचे जंगल आज निगर्साला मारक ठरत असून याचाच परिणाम आहे की पावसाळ््यात पाऊस पडत नसून उन्हाळ््यात सूर्य आग ओकू लागला आहे.
हेच कारण आहे की, पूर्वी कधीही ४५ डिग्रीपर्यंत न जाणारे तापमान आता ४५ डिग्रीच्या पार जात असून तापमानाची ही पातळी वर्षानुवर्षे वाढतच जाणार आहे.
यंदाही असाच काहीसा प्रकार जाणवू लागला आहे. यंदा मार्च व एप्रिल महिन्यापासूनच सूर्याने आग ओकली. त्यात आता मे महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून जिल्हावासीयांना चटका देण्यास सुरूवात केली.
मे महिन्यात सुरूवातीपासूनच ४२ डिग्रीच्यावर तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उन्हाळ््यात मे महिनाच खरा मानला जातो.
मे महिन्यातच सूर्य आग ओकत असल्याचेही बोलले जाते. तोच प्रकार सध्या बघावयास मिळत आहे. दिवसेंदिवस तापमान वाढत चालल्याने आता कधी या उन्हापासून सुटका मिळते असे सवर्च बोलू लागले आहेत. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून कधी पाऊस बरसून उकाड्यापासून एकदाची सुटका करतो याची सर्वच वाट बघत आहेत.