जिल्ह्यात कलाम यांना भावपूर्ण सलाम
By admin | Published: July 30, 2015 01:40 AM2015-07-30T01:40:56+5:302015-07-30T01:40:56+5:30
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक, देशाचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन व अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेले भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे सोमवारी निधन झाले.
गोंदिया : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक, देशाचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन व अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेले भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे सोमवारी निधन झाले. त्यांचे एकाएकी जाणे अनेकांना चटका लावून गेले. त्यांना जिल्हयात ठिकठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
उमादेवी शिक्षण संस्था
गोंदिया : सदर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट, प्रोग्रेसिव्ह इंग्रजी शाळा, आयसीएसई, मराठी, हिंदी, कनिष्ठ महाविद्यालय, प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालयाद्वारे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, प्राचार्य प्रशासकीय अधिकारी, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे योगदान व उपलब्धी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
मनोहरभाई पटेल महाविद्यालय
सडक-अर्जुनी : मिसाईल मॅन, भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम शिलांग येथील इंडियन इंस्टिट्युट आॅफ मॅनेजमेंटमध्ये व्याख्यान देत असताना हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. त्यांना सडक-अर्जुनी येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयात प्राचार्य डॉ. आलोक द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. संचालन प्रा. ए.एम. पाटील यांनी केले. या वेळी शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्कार हायस्कूल
गोंदिया : संस्कार हायस्कूलमध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी शाळा अध्यक्ष मधू बंसोड, मुख्याध्यापिका सिंधू धोटे, जयश्री फुले, नलिनी चव्हाण, वर्षा कोहळे, राखी पुंजे, शीतल शहारे, सुचिता सोनवाने, शिल्पा अग्रवाल, शिल्पा मेश्राम, निशा शर्मा, भाग्यशाली कठाणे, अनिता चोरनेले, वर्षा बिसेन, वर्षा चव्हाण, विजया उके, सृष्टी अग्रवाल, कल्याणी बागडे, ज्योती सारंगपुरे, किरण वसंतानी व विद्यार्थी उपस्थित होते.
युवा सेना
गोंदिया : शिवसेना, युवा सेना व भारतीय विद्यार्थी सनेने नेहरू चौकात शोकसभा घेवून भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी प्रामुख्याने माजी आ. रमेश कुथे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे, भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रशांत ठवकर, युवा सेनेचे समिर आरेकर, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक प्रशांत कोरे, पुरूषोत्तम ठाकरे उपस्थित होते. तसेच याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तेजराम मोरघडे, सुनील लांजेवार, शहरप्रमुख विक्रमसिंह बैस, दीपकम बोबडे, विनोद तामसेटवार, चुन्नी चौरावार, प्रीतम लिल्हारे, कमलेश बनकर, हिमांशू कुथे, प्रशांत गणवीर आदी शिवसेना व विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कालीमाटी
कालीमाटी : येथील हनुमान मंदिराच्या सभामंडपात भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी भागवत बहेकार, गजानन भुते, सेवा सहकारी संस्थेचे सदस्य राजू फुंडे, अध्यक्ष बंडू दोनोडे, शंकर रहांगडाले, मारूती फुंडे, यवकराम फुंडे, बाबू शेंडे, टीकाराम मेंढे, शंकर मुनेश्वर, हेमराज गिऱ्हेपुंजे, भोजू गिऱ्हेपुंजे उपस्थित होते. याप्रसंगी माजी राष्ट्रपती कलाम यांच्या छायाचित्रावर माल्यार्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या विचारांना युवा पिढीने अंगीकृत करावे, असे मत फुंडे यांनी व्यक्त केले. संचालन हेमंत शेंडे यांनी तर आभार भास्कर पटले यांनी मानले.
लोककला संस्था
बाराभाटी : येथील लोककला साहित्य सेवाभावी बहुउद्देशिय संस्था येरंडी/बाराभाटीद्वारा देशाचे माजी राष्ट्रापती, भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम आणि आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते रा.सू. गवई यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम.आर. नंदागवळी, उपाध्यक्ष गुरूदेव रामटेके, सचिव चंद्रगुणी तिरपुडे, संगम नंदागवळी, के.ए.रंगारी, चेतन नंदागवळी, नंदेश्वर रामटेके आदी पदाधिकारी उपस्थित होते.