कामधेनूने वाढविले २० टक्के दूध उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 09:29 PM2019-05-08T21:29:35+5:302019-05-08T21:30:10+5:30

जिकडे-तिकडे शेतकऱ्यांची विदारक स्थिती असताना पारंपरिक शेतीतून प्रगती होत नसल्याने कर्जाचे डोंगर घेऊन संसाराचा गाडा रेटताना शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाची मदत घ्यावी लागते. शेळी पालन, दुग्ध व्यवसायासाठी पशूपालन केले जाते.

Kamdhenu increased 20 percent milk production | कामधेनूने वाढविले २० टक्के दूध उत्पादन

कामधेनूने वाढविले २० टक्के दूध उत्पादन

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील ३३६ दत्तक ग्राम : जनावरांच्या देखरेखीसाठी दीड लाख रूपये

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिकडे-तिकडे शेतकऱ्यांची विदारक स्थिती असताना पारंपरिक शेतीतून प्रगती होत नसल्याने कर्जाचे डोंगर घेऊन संसाराचा गाडा रेटताना शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाची मदत घ्यावी लागते. शेळी पालन, दुग्ध व्यवसायासाठी पशूपालन केले जाते. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच असताना दुसरीकडे ज्या गावाला कामधेनू दत्तक ग्राम म्हणून स्वीकारण्यात आले. त्या गावातील पशुपालकांना योग्य मार्गदर्शन करून दूध उत्पादनावर भर देण्यात आला. सन २०११-१२ पासून आतापार्यंत जिल्ह्यातील ३३६ गावांना कामधेनू ग्राम म्हणून दत्तक घेतले. त्या गावातील दूध उत्पादन पूर्वीपेक्षा २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गावात दूध उत्पादनात वाढ करण्यात यावी, गाय, म्हशी पालनाला तांत्रीक जोड देऊन लसीकरणापासून जनावरे संवर्धनापर्यंतची जबाबदारी सांभाळण्याची किमया पशुसंवर्धन विभागाकडून कामधेनू दत्तक गावात करण्यात येते. गोंदिया जिल्ह्यात कामधेनू दत्तक ग्राम योजनेत सन २०१८-१९ या वर्षात ३० गावांचा समावेश आहे. त्या गावात पूर्वीच्या तुलनेत २० टक्के दूध उत्पादन वाढले आहे. शेतकºयांच्या पारंपरिक शेतीला पूरक जोड देणारा दुग्ध व्यवसाय वाढविला आहे. सन २०११-१२ पासून कामधेनू दत्तक ग्राम योजना राबविण्यात आली. या वर्षी ३१ गावे दत्तक घेतली होती. सन २०१२-१३ या वर्षी ६५ गावे, सन २०१३-१४ या वर्षी ६७ गावे, सन २०१४-१५ या वर्षी ५३ गावे, सन २०१५-१६ या वर्षी ३२ गावे, सन २०१६-१७ या वर्षी ३२ गावे, सन २०१७-१८ या वर्षी २६ गावे व २०१८-१९ या वर्षी ३० अशा ३३६ गावांना कामधेनू योजनेत दत्तक घेण्यात आले. त्या गावातील पशूपालकांना योग्य मार्गदर्शन केल्यामुळे गावातील दूध उत्पादनात २० टक्क्याने वाढ झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे सन २०१९-२० या वर्षात कामधेनू दत्तक ग्रामची लवकरच निवड केली जाणार आहे. ३०० पैदास योग्य पशू असणाºया या गावांची पशू गणना करून त्या गावांची कामधेनू दत्तक ग्राम म्हणून निवड करण्यात आली. एप्रिल महिन्यापासून १२ टप्प्यात पशू गणना करून सर्व निकष पूर्ण करणाऱ्या गावाला कामधेनू दत्तक ग्राम म्हणून पशूसंवर्धन विभाग स्वीकारते. या दत्तक गावाला वर्षासाठी १ लाख ५२ हजार रूपये जनवारांच्या संवर्धनासाठी दिले जातात. गावातील सर्वाधिक पशू असणाºया मालकाची पशुमालक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली जाते. या मंडळाची आत्मा या संस्थेतून नोंदणी केली जाते. शेतकऱ्यांचा व
पशुमालकांचा आर्थिक विकास कसा होईल यावर यातून चर्चा घडवून आणली जाते.
दत्तक गावात होते हे कार्य
ज्या गावाला दत्तक घेतले त्या गावातील सर्व जनावरांचे लसीकरण, दुग्ध उत्पादन किती आहे. दूध उत्पादन वाढविण्यासाठी काय करता येईल,जनावरांची औषधे, खनिजद्रव्ये, जंतनाशक औषधी, गोचीड, शेतकऱ्यांची सहल नेणे, नाविन्यपूर्ण उपक्रम, संकरित वासरांचा मेळावा घेऊन त्यांना बक्षीस देणे, वैरण विकासासाठी प्रयत्न करणे, जनावरांच्या विस्तारासाठी कार्यक्रम घेणे, गोठा स्वच्छ करणे, चाºयाचे व खताचे व्यवस्थापन करण्यात येते.
कामधेनू दत्तक गावात रात्री मुक्काम
कामधेनू गावातील शेतकऱ्यांना व पशुमालकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.राजेश वासनिक व त्यांचे इतर अधिकारी त्या गावात एक दिवस रात्रीचा मुक्काम करतात. मागील वर्षी वर्षभर त्यांनी हा उपक्रम राबविला. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ कशी करता येईल यावर मार्गदर्शन केले. कामधेनू गावात पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे डॉ.वासनिक यांनी सांगितले.

कामधेनू दत्तक गावाला वेळोवेळी मार्गदर्शन करून तेथील दूध उत्पादनावर लक्ष केंद्रित केल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील कामधेनू दत्तक ग्रामात २० टक्याने दुधाचे उत्पादन वाढले आहे. त्या गावातील पशूंचे देखरेख व मार्गदर्शन केले जाते.
-डॉ. राजेश वासनिक
जिल्हा पशुसंर्वधन अधिकारी जि.प. गोंदिया.

Web Title: Kamdhenu increased 20 percent milk production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :milkदूध