कन्हानचे ज्वेलर्स लुटणारे दरोडेखोर गोंदियात अटक

By admin | Published: May 23, 2017 12:50 AM2017-05-23T00:50:19+5:302017-05-23T00:50:19+5:30

कन्हानच्या गणेशनगरातील अमित ज्वेलर्स येथे पिस्तुलच्या धाकावर २७ लाखाचे दागिणे लुटणाऱ्या तीन आरोपींना नागपूर ग्रामीण व गोंदियाच्या ...

Kanhaiya Jewelers robber robbery arrested in Gondiya | कन्हानचे ज्वेलर्स लुटणारे दरोडेखोर गोंदियात अटक

कन्हानचे ज्वेलर्स लुटणारे दरोडेखोर गोंदियात अटक

Next

गोंदिया व नागपूर ग्रामीण एलसीबीची कारवाई : २७ लाखांचा माल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कन्हानच्या गणेशनगरातील अमित ज्वेलर्स येथे पिस्तुलच्या धाकावर २७ लाखाचे दागिणे लुटणाऱ्या तीन आरोपींना नागपूर ग्रामीण व गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करून आज (दि.२२) रोजी तिघांना अटक केली आहे. आरोपीनी रोख रक्कम खर्च केली. परंतु दागिणे त्याच्या जवळून जप्त करण्यात आले.
कन्हानच्या गणेशनगरातील अमित ज्वेलर्समधून १४ मेच्या दुपारी २ ते ३ वाजता दरम्यान दिवसा ढवळ्या चौघांनी पिस्तुलच्या धाकावर दरोडा घातला होता. तिथून लुटलेले दागिणे व पैसे पकडून पोलिसांच्या भितीने आरोपी रामटेक त्यानंतर वाराणसी व तेथून गोंदियाला आले होते. त्यांनी लुटलेला माल सुरक्षीत ठेवण्यासाठी १० टक्के कमिशनवर तुमचा माल सुरक्षित ठेवतो व राहण्यासाठी व्यवस्था करतो. अशी ग्वाही गोंदियातील आरोपी जितेंद्र उर्फ भुरू धोटे रा. रामनगर याने दिली होती. कन्हान येथे आरोपी योगेश फुलसिंग यादव (२५) रा. स्वामी विवेकानंद नगर कन्हान हल्ली मु. रामटेके, नितेश उर्फ आर्यन मुन्नेलाल राठौड (२४) रा. बोटेझरी ता. वाराणसी जि. बालाघाट हल्ली मु. कन्हान नागपूर, त्याचे साथीदार पियुष व विनय या चौघांनी दरोडा घालून साहित्य लूटून नेले होते. या संदर्भात कन्हान पोलिसांनी भादंविच्या कलम ३०७, ३९४, ३४, सहकलम ३,२५ भारतीय हत्यार कायदान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करताना नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करून रामनगरच्या सूर्याटोला परिसरात शक्ती मंदिराजवळील मोतीराम गौतम यांच्या घरी त्यांनी सदर दागिणे लपवून ठेवले होते. कारवाई करणारे पथक त्या ठिकाणी गेले असता आरोपी बंद असलेल्या खोलीत चटईवर झोपले होते. त्या आरोपीना पोलिसांनी खिडकीतून पाहिल्यावर झोपलेल्या तिघांपैकी दोघे कन्हान पोलिसांच्या अभिलेखावर आरोपी म्हणून असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी सापळा रचून त्यात तिघांना पकडले. त्यात योगेश यादव, मितेश राठौड व जितेंद्र उर्फ भुरू मारोती धोटे (३५) रा.रामनगर याच्या समावेश आहे.
या प्रकरणात चोरी केलेली रक्कम खर्च झाली. परंतु सोन्याचे दागिणे त्याच्याकडे आढळले. सदर कारवाई नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे उल्हास भुसारी, पुरुषोत्तम अहेरकर, राजेंद्र सनोडिया, अजय तिवारी, शैलेश यादव, अमोल कुथे, राजकुमार, सचिन, कमलाकर, उमेश, कार्तिक, गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार, निलेंद्र बैस, विनय शेंडे, पोलीस हवालदार खापेकर यांनी केली आहे. सदर आरोपींना नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

१० टक्के कमिशनवर झाला करार
कन्हानच्या अमीत ज्वेलर्स मधून साहित्य चोरणाऱ्या आरोपीच्या मागावर नागपूर शहर व नागपूर ग्रामीण पोलीस आहेत. हे आरोपीच्या लक्षात आणले नाही. ते अटक होण्याच्या भितीने रामटेक, वाराणसी व नंतर गोंदिया येथे पळून आले. त्यांना राहण्यासाठी जागा नसल्याने त्याचा साथीदार जितेंद्र उर्फ भुरु मारोती धोटे याने या आरोपीसोबत करार केला. चोरी केलेल्या मालातील १० टक्के मला मिळाले. तर तुमच्या राहण्याची व्यवस्था करून देतो असे म्हटले. त्यावर त्याच्या करार झाला. जितेंद्र ओळखीचे असलेले मनिराम गौतम याच्या घरी दोन दिवसापासून त्यांना ठेवण्याची व्यवस्था केली होती.
पिस्तुल व जिवंत काडतूस जप्त
कन्हानच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक पिस्तुल व चार जिवंत काडतूस आरोपीजवळून मिळाले. २४ हजार रुपये रोख, ९ सोन्याचे पदक, ३ सोन्याचे मनी, १ एकदाणी, सोन्याची साखळी, २ सोन्याचे हार, १० नेकलेस, ६ ठुस्या, २२ पेडंट, ७ पांढऱ्या खड्याचे पेडंट, २२ टॉप्स, १ जोड रिंग, १ सोन्याची साखळी, १ आंगठी, १३ जोडी बागड्या, ५ सोन्याचा माळा, ४ डिझाईन पट्टे, ५ बाजुबंद, १४ सोन्याचा साखळ्या, २ खड्याचा आंगठ्या, १० तोरड्या, ५ जिवत्या व आरोपीजवळील चार मोबाईल असा माल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Kanhaiya Jewelers robber robbery arrested in Gondiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.