स्वयंरोजगाराची कास धरा

By admin | Published: January 13, 2015 11:02 PM2015-01-13T23:02:38+5:302015-01-13T23:02:38+5:30

विदर्भ हा कोणत्याही बाबतीत मागासलेला नसून आता येथील युवकांनी येथील जमीन, पाणी, वन, गौणखनिज आदी नैसर्गिक स्त्रोतांच्या माध्यमातून व शिक्षणासह स्वकौशल्याच्या बळावर

Keep yourself self-employed | स्वयंरोजगाराची कास धरा

स्वयंरोजगाराची कास धरा

Next

अनिल सोले यांचा सल्ला : भाजयुमोचा रोजगार मार्गदर्शन मेळावा
गोंदिया : विदर्भ हा कोणत्याही बाबतीत मागासलेला नसून आता येथील युवकांनी येथील जमीन, पाणी, वन, गौणखनिज आदी नैसर्गिक स्त्रोतांच्या माध्यमातून व शिक्षणासह स्वकौशल्याच्या बळावर रोजगार निर्मिती करावी, असे आवाहन आमदार प्रा. अनिल सोले यांनी केले.
भारतीय जनता युवा मोर्चातर्फे १२ जानेवारी रोजी युवा दिनानिमित्त पवार बोर्डिंग येथे आयोजित रोजगार मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल होते.
मंचावर प्रामुख्याने खासदार नाना पटोले, जिल्हा परिषद सभापती प्रकाश गहाणे, जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजय कुळकर्णी, भाजप शहर अध्यक्ष भरत क्षत्रीय, जयंत शुक्ला, सविता इसरका, मुनाफ कुरेशी, डॉ. सुवर्णा हुबेकर, ऋशीकांत साहू, डॉ. लक्ष्मण भगत, दुर्गाप्रसाद नागभिरे, पंकज सोनवाने, शुक्राचार्य ठाकरे, तानाजी लंजे, देवचंद नागपूरे, विकास पटले, गुड्डू डोंगरवार, संदीप कापगते, निलेश दमाहे, मनोज दमाहे, राजेश शाह आदी उपस्थित होते.
भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. स्वामी विवेकानंद यांचा आदर्श जोपासत केंद्र व राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशाच्या विकासाकरीता युवाशक्तीचा वापर करुन भारताला जगापुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. रोजगाराभिमुख विकास हा राज्य व केंद्राचा प्रमुख कार्यक्रम आहे. आजघडीला रोजगाराच्या अपरिमित संधी निर्माण होत असून कौशल्यप्राप्त मुनष्यबळाची मोठी आवश्यकता आहे. त्यामुळे युवकांनी पुस्तकी ज्ञानासोबत स्वकौशल्य विकसीत करुन केवळ नोकरीच नव्हे तर उद्योग व व्यवसायाकडे वळावे असे आ.सोले म्हणाले.
विदर्भातील युवकांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी माहिती मिळावी, यासाठी नागपूर येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातून युवकांना रोजगाराची दिशा मिळणार आहे. यावेळी खासदार पटोले यांनी, गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी अनेक प्रकल्पांचा विचार सुरु असून त्याकरीता केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. लवकरच या माध्यमातून क्षेत्राचा विकास साधला जाणार असल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांनी, युवकांना स्वामी विवेकानंदांच्या विचारांपासून संधी निर्माण करुन देशाला पुढे नेले. आता पंतप्रधान मोदी देशातील युवकांच्या शक्ती व कौशल्यावर विश्वास ठेवून भारताला विश्वगुरु करण्याचे स्वप्न बघत आहेत. त्याकरीता युवकांनी परिश्रम करुन संधीचे सोने करावे, असे आवाहन केले .
दरम्यान आ. प्रा. सोले यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून युवकांना रोजगारा संदर्भात मार्गदर्शनपर चित्रफित दाखविली. यावेळी अनेक युवकांनी भाजयुमोमध्ये प्रवेश केला. संचालन मुकेश चन्ने यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी मांडले. आभार शुक्राचार्य ठाकरे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी निकुंज साहू, रोहित अग्रवाल, निरज ठाकूर, छोटू भाटिया, छोटू रामटेककर, दिलीप पिल्ले, सतीश मेश्राम, बाबा बिसेन, संदीप पटले, शैलेश ढाले, विवेक भुंबर, रंजित नागपूरे, अनुराग शुक्ला, प्रसन्ना ठाकूर, राजेंद्र कावळे, गोल्डी गावंडे, गोल्डी मारवाहे, कनिराम तवाडे, योगेंद्र हरिणखेडे, कुणाल बिसेन, कमलेश सोनवाने, प्रकाश पटले, संजय जगने, ज्ञानचंद जमईवार, फणेंद्र पटले, कमलेश आतीलकर, कमलेश चुटे, कुशल अग्रवाल यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदादिकारी व सदस्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Keep yourself self-employed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.