केरोसिन परवाने मृत दुकानदारांच्या वारसांच्या नावे वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:20 AM2021-06-10T04:20:28+5:302021-06-10T04:20:28+5:30
गोंदिया : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रास्तभाव दुकानदारांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या वारसांच्या नावे दुकान वर्ग करण्याबाबतचे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी राजेश खवले ...
गोंदिया : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रास्तभाव दुकानदारांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या वारसांच्या नावे दुकान वर्ग करण्याबाबतचे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी काढले.
जिल्ह्यातील चार रास्तभाव दुकाने व पाच केरोसिन परवाने वारसांच्या नावे वर्ग करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रास्तभाव दुकानातून पात्र लाभार्थ्यांना स्वस्त धान्याचे वितरण करण्यात येते. रास्त भाव दुकानदारांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या वारसांच्या नावाने दुकान केली जाते. परिणामी वारसाच्या नावे दुकान होण्याचे आदेश होईपर्यंत असे रेशन दुकान जवळच्या दुकानास जोडले जाते. गावातील रेशन दुकान इतर गावातील दुकानदारास जोडल्यानंतर मूळ गावातील लाभार्थ्यांना शिधावस्तू उचल करण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे रास्तभाव दुकान व केरोसिन परवाने मूळ दुकानदारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसाच्या नावे करण्याची कार्यवाही त्वरेने करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने चार रास्तभाव दुकाने व पाच केरोसिन परवाने वारसाच्या नावे वर्ग करण्याबाबतचे आदेश पारीत झाले आहेत. परवाना वर्ग करण्यात आलेल्या वारसांची नावे देवकू देवाजी मलखांबे, रा. चिचोली, ता. अर्जुनी मोरगाव, रास्तभाव दुकान व केरोसिन परवाना; दिनेश कृष्णकुमार पटले, रा. डोंगरगाव, ता. आमगाव, रास्तभाव दुकान व केरोसिन परवाना; गमेंद्र गुलाबराव बिसेन, रा. टेमनी, ता. सडक अर्जुनी, रास्तभाव दुकान व केरोसिन परवाना; अयाजुद्दीन यकीनउद्दीन खान, रा. कोदामेडी, ता. सडक अर्जुनी, रास्तभाव दुकान व केरोसिन परवाना; नीतेश गेंदलाल पटले, रा. कोपीटोला, ता. आमगाव, केरोसिन परवाना. दरम्यान, लाभार्थ्यांनी या दुकानातून शिधावस्तू उचल कराव्या, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले आहे.