केशोरी पोलीस स्टेशनचा ‘पाऊल पडते पुढे’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2022 05:00 AM2022-01-09T05:00:00+5:302022-01-09T05:00:08+5:30
पोलीस स्टेशनच्या मुख्य द्वारावरून ठाणेदार संदीप इंगळे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर प्रतिबंध लावण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस स्टेशन आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांनी सजग राहून कोरोना या महामारीपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. सतत मास्कचा वापर करण्यात यावा.
लाेकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पोलीस विभागाने एक पाऊल पुढे टाकत येथील पोलीस स्टेशन आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांनी सजग राहून कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी कोरोनासंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, यासाठी कोरोना जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
पोलीस स्टेशनच्या मुख्य द्वारावरून ठाणेदार संदीप इंगळे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर प्रतिबंध लावण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस स्टेशन आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांनी सजग राहून कोरोना या महामारीपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. सतत मास्कचा वापर करण्यात यावा. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस घ्यावे.
कोरोनाबाधित रुग्णांनी त्वरित आरोग्य विभागास माहिती द्यावी, असे कोरोनासंदर्भातील विविध संदेश रॅलीच्या माध्यमातून देण्यात आले.
नियमांचे करा काटेकोरपणे पालन
- यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल यांनी कोरोना या जागतिक महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा भयावह अनुभव घेतला आहे. केशोरीतील अनेक कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि आता कोरोनाची तिसरी लाट येऊ पाहत आहे. यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवावयाचे असेल, तर कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वांनी कोरोनाचे नियम पाळून कोरोनाला हटवण्यासाठी प्रशासनाला मदत करावी, असे सांगितले. ठाणेदार संदीप इंगळे यांनी सांगितले की, कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून कोरोनासंदर्भातील निर्बंध पाळणे सर्वांना बंधनकारक आहे.
स्लोगन आणि बॅनर्समधून जनजागृती
- नागरिकांनी कोरोनाचे नियम, निर्बंध पाळले नाही तर कडक निर्बंधास नागरिकांना सामोरे जावे लागेल. यापासून कोणीही सुटणार नाही आणि त्यासाठीच प्रामुख्याने कोरोना जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. कोरोना जनजागृती रॅलीमध्ये पोलीस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. स्लोगन व बॅनर्सच्या माध्यमातून कोरोनाविषयी जनजागृती करण्यात आली. गावातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करीत कोरोना जनजागृती रॅलीचे विसर्जन पोलीस स्टेशनच्या प्रांगणात करण्यात आली.