समस्यांच्या निराकरणाची मुख्य कडी जनता दरबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 09:36 PM2019-08-12T21:36:44+5:302019-08-12T21:37:28+5:30
जिल्हयातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. यामुळे प्रत्येक दौऱ्यात जनतेच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्यास प्रथम प्राथमिकता आहे. त्यामुळे जनता दरबार घेतला जात असून हा एक खुला दरबार असून येथे प्रत्येकाला आपली बाजू शासनापुढे मांडता येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हयातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. यामुळे प्रत्येक दौऱ्यात जनतेच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्यास प्रथम प्राथमिकता आहे. त्यामुळे जनता दरबार घेतला जात असून हा एक खुला दरबार असून येथे प्रत्येकाला आपली बाजू शासनापुढे मांडता येते. नागरिकांच्या समस्यांच्या निकारणाची मुख्य कडी जनता दरबार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, वन व आदिवासी राज्यमंत्रती तसेच गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.
गोंदिया जिल्ह्यातील दौऱ्यांव्सकार असताना रविवारी (दि.११) येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित जनता दरबारमध्ये ते बोलत होते.
याप्रसंगी नामदार डॉ. फुके यांनी कित्येक सामाजिक संघटना, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची भेट घेवून त्यांच्या समस्या जाणून निवेदन स्वीकारले. तसेच अधिकाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधून व त्यांना बोलावून समस्यांचे त्वरीत निराकरण करण्याचे आदेशही दिले.