खरीप हंगामपूर्व आढावा सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 09:49 PM2019-06-07T21:49:42+5:302019-06-07T21:50:21+5:30
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा), तालुका कृषी अधिकारी कार्यालय सालेकसा अंतर्गत तालुक्यातील शेतकरी मित्रांची खरीप हंगामपूर्व आढावा सभा घेण्यात आली. सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अरविंद उपवंशी, तांत्रिक कृषी सहायक पी.आर.कोकाटे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा), तालुका कृषी अधिकारी कार्यालय सालेकसा अंतर्गत तालुक्यातील शेतकरी मित्रांची खरीप हंगामपूर्व आढावा सभा घेण्यात आली.
सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अरविंद उपवंशी, तांत्रिक कृषी सहायक पी.आर.कोकाटे उपस्थित होते. सभेत सर्वप्रथम अरविंद उपवंशी यांनी मागील सभेमध्ये घेण्यात आलेल्या विषयांचा आढावा घेतला. यानंतर उपस्थितांना खरीप हंगामपूर्व तयारी कशी करावी यामध्ये माती परीक्षण,बियाणे, खरेदी करताना घ्यावयाची काळजी, निंबोळी गोळा करण्याची मोहीम राबविणे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ मोहीमे अंतर्गत पंधरवाडा राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
पी.आर.कोकाटे यांनी शेतकऱ्यांना रासायनिक खते व औषधीवरचा खर्च कसा कमी करता येईल. खताचे नियोजन कसे करावे, बिज प्रक्रिया कशी करावी, खत व औषधीचे प्रमाण कसे वापरावे, जिवामृत, घनजिवामृत, निंबोळी अर्क, गांडूळ खत वापराचे फायदे व कार्यपद्धती, त्याचप्रमाणे शासनाच्या कृषी विभागाच्या योजना यामध्ये पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना, कृषी यांत्रिकीकरण, ठिंबक सिंचन, तुषार सिंचन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. क्रापसॅप संलग्न शेतीशाळा तालुक्यात कशा प्रकारे राबविली जाणार आहे याची माहिती दिली.
शेतकरी मित्र श्रीकिसन हुकरे, तिलकसिंग मच्छिरके, भरतलाल लिल्हारे, भैयालाल बोरघरे, जैपाल राणे, दिलीप टेकाम, किशोपर वालदे, चुन्नीलाल खजुरीया, ओमप्रकाश दशरिया, मोतीराम भेंडारकर, सीमा हरिणखेडे, प्रमिला बहेकार, इंदू मेंढे उपस्थित होते.