१२ लाख आदिवासींच्या बँक खात्यात खावटी अनुदानाची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:30 AM2021-05-11T04:30:42+5:302021-05-11T04:30:42+5:30
गोंदिया : राज्यात कोरोनामुळे हाहाकार माजला असून दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा भार आला आहे. आरोग्य यंत्रणाही कमी ...
गोंदिया : राज्यात कोरोनामुळे हाहाकार माजला असून दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा भार आला आहे. आरोग्य यंत्रणाही कमी पडत असल्याने मृत्यूचा आकडा वाढला आहे. त्यामुळे राज्य शासनाने कठोर निर्बंधानंतर लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यात हातावर पोट असणाऱ्यांसाठी शासनाकडून मदत जाहीर केली असून आदिवासी बांधवांच्या बँक खात्यात खावटी अनुदान देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत १२ लाख आदिवासींच्या खात्यात वळती झाली आहे.
कोरोनाचे संकट दिवसागणिक अजूनही गडद होत असून सर्वसामान्यांच्या जगण्यावर काही निर्बंध आले. त्याचा परिणाम म्हणून अर्थचक्र मंदावले. रोजी रोटीवर परिणाम झाला. याचे दुष्पपरिणाम शहराबरोबच ग्रामीण आणि आदिवासी भागातही होत आहेत. आदिवासी कुटुंबाना दिलासा देण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरू केली आहे. ऑनलाईन पद्धतीने एकाच वेळी १२ लाख कुटुंबाच्या बँक खात्यात खावटी अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. पुर्वी खावटी कर्ज स्वरूपात दिले जात होते. परंतु यंदा अनुदान जाहीर झाले असून ते परत करण्याची गरज राहणार नाही. या योजनेत २ हजार रुपये रोख व २ हजार रुपयांच्या वस्तू देण्यात येणार असल्याने कोरोना काळात ही मदत खूप मोलाची असणार आहे. त्यासाठी विभागाला ४२८ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.