दीड लाखाच्या खंडणीसाठी आरोग्य सेवकाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:34 AM2021-09-08T04:34:52+5:302021-09-08T04:34:52+5:30

पंचायत समिती कॉलनी बस स्थानकामागे राहणारे आरोग्य सेवक सुरेश कस्तुरे हे ५ सप्टेंबर रोजी सायकलने ढाकणी येथे नोकरीवर ...

Kidnapping of a health worker for a ransom of Rs 1.5 lakh | दीड लाखाच्या खंडणीसाठी आरोग्य सेवकाचे अपहरण

दीड लाखाच्या खंडणीसाठी आरोग्य सेवकाचे अपहरण

googlenewsNext

पंचायत समिती कॉलनी बस स्थानकामागे राहणारे आरोग्य सेवक सुरेश कस्तुरे हे ५ सप्टेंबर रोजी सायकलने ढाकणी येथे नोकरीवर गेले असताना सायंकाळी ६.५५ वाजता त्यांच्या फोनवरून पत्नी मीना सुरेश कस्तुरे (४२) यांना फोन आला. मला दीड लाख रुपये रात्री १२ वाजतापर्यंत आणून दे, तुझ्या पतीला झाडाला बांधून ठेवले आहे. त्याला मारहाण करीत आहे. तुम्ही पैसे न आणून दिल्यास त्याचे तुकडे-तुकडे करून फेकून देईल, मग ते तुम्ही उचलून घेऊन जा, अशी धमकी देण्यात आली. परत ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता धमकी देण्यात आली. यासंदर्भात मीना कस्तुरे यांनी रामनगर पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३६४ (अ) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास सहायक फौजदार मारोती गोमासे करीत आहेत.

Web Title: Kidnapping of a health worker for a ransom of Rs 1.5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.