बुध्द धम्म जाणून घेणे युवकांची खरी जबाबदारी
By admin | Published: March 2, 2016 02:19 AM2016-03-02T02:19:37+5:302016-03-02T02:19:37+5:30
आजचा युवक विज्ञान युगामध्ये जगत आहे. नवीन विकसित होणारे तंत्रज्ञान तो आपल्या डोळ्यासमोर बघत आहे.
शहारे : युवा परिवर्तन संघाचे शिबिर
गोंदिया : आजचा युवक विज्ञान युगामध्ये जगत आहे. नवीन विकसित होणारे तंत्रज्ञान तो आपल्या डोळ्यासमोर बघत आहे. तरीसुध्दा उघड डोळ्याने बघण्यासाठी क्षमता नसल्यामुळे अंधश्रध्दा जोपासत आहे. बुध्दाचे विचारातील विज्ञान एक अंश आहे. त्यासाठी युवकाने सद्सद्बुध्दीचा वापर करून बुध्द धम्म जानून घ्यावे. त्यामुळे त्याला जगाचे सत्य समझेल व तो नैतिकतेच्या आधारे जीवन जगणे सुरू करेल. तेव्हाच कुटुंबाचा व समाजाचा विकास करण्याचे धैर्य त्याचा अंगी येईल, असे विचार सत्यशोधक प्रबोधनकार शुध्दोधन शहारे यांनी व्यक्त केले.
युवा परिवर्तन संघाच्या वतीने रविवारी हिमगिरी ले आऊट येथे कॅडर कॅम्प घेण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. त्यांनी बुद्ध धम्म जीवन जगण्याचा उत्तम मार्ग असून त्या तत्वांनुसार जीवन जगल्यास आनंद व शांती प्राप्त होते, असे सांगितले.
प्रास्ताविक राहुल अंबादे व संचालन अखिलेश बोरकर यांनी केले. आभार प्रकाश बागे यांनी मानले. कार्यक्रमासाठी युवा परिवर्तन संघाचे सदस्य बबिता खोब्रागडे, निशा सिंगाडे, दीपलता बंसोड, पूनम राऊत, मीनल बंसोड, चंद्रकांत मेश्राम, आकाश इंदुरकर, पंकज टेंभेकर, तुषार मेश्राम, अमित रामटेके, प्रशांत बडोले, प्रणय दरवडे, राहुल टेंभेकर, सुरेंद्र रामटेके, नंदु मानकर, नितीन श्यामकुवर, रक्षणा बोरकर, राहुल मेश्राम, प्रीती बंसोड, पूजा रंजारी, पराग खोब्रागडे, विकास श्यामकुवर यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)