कोयापूनेम महोत्सव मंगळवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:46 PM2018-01-27T22:46:59+5:302018-01-27T22:47:29+5:30
दरवर्षी माघ पौर्णिमेत येणारी पाच दिवसीय कचारगड यात्रा आणि कोयापूनेम महोत्सव ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
आॅनलाईन लोकमत
सालेकसा : दरवर्षी माघ पौर्णिमेत येणारी पाच दिवसीय कचारगड यात्रा आणि कोयापूनेम महोत्सव ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवादरम्यान लाखोंच्या संख्येने देशाच्या विविध राज्यातील आदिवासी भाविक आपल्या पूर्वजांना स्मरण करण्यासाठी कचारगडला हजेरी लावणार आहेत. त्याचबरोबर या कोयापूनेम महोत्सवात केंद्र व राज्य शासनातील विविध मान्यवरांची उपस्थित लाभेल. यात केंद्रीय व राज्यमंत्री, प्रशासनिक अधिकारी-पदाधिकारी आणि उच्च पदस्थ व्यक्ती सुध्दा सहभागी होणार असून मंगळवारी (दि.३०) कचारगड यात्रेला सुरुवात होणार आहे.
यात्रेचे स्वागताध्यक्ष म्हणून आमदार संजय पुराम राहणार असून देवस्थान समितीचे मार्गदर्शक शंकरलाल मडावी यांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात होईल. अध्यक्षस्थानी पी.एस.खंडाते राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून देवरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश ताराम, गोंडी मार्गदर्शक तेजराम मडावी, मोहन सिडाम, धनलाल प्रदिते, दयाराम परते मनोज इळपाते, चमन पंधरे, मोहन पंधरे, गोपाल उईके, गुलाबसिंह कोडापे, तुळशीराम सलामे उपस्थित गोंडी भूमक (पुजारी) धूरसिंग कुंभरे आणि मंगलसिंह कुंभरे यांच्या मार्गदर्शनात धार्मिक विधीनुसार कार्यक्रमाला सुरुवात होईल.
यात्रेंतर्गत, बुधवारी (दि.३१) मुख्य आयोजनाला सुरुवात होणार असून सकाळी ९ वाजता गोंडी धर्माचे सप्तरंगी ध्वज फडकाविण्यात येईल. राजे वासुदेवशहा टेकाम यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येईल. तसेच आमदार पुराम याच्या हस्ते गोंडवाना साम्राज्याचा झंडा फडकाविण्यात येईल. अध्यक्षस्थानी गोंडी धर्म प्रचारक दादा हिरासिंह मरकाम राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून शीतल मरकाम, शेरसिंग आचला, राजमाता फुलवादेवी, मधुकर उईके, दिलीप मडावी, डॉ. नामदेव किरसान, मारोतराव कोवासे, रामरतन राऊत, नामदेव उसेंडी, आनंद गेडाम, दरबूसिंग उईके, सहेषराम कोरोटे, भरतसिंग दूधनाग, देवराज वडगाये, हिरालाल फाफनवाडे, एम.एल.आत्राम, प्रल्हाद कुंभरे, सुकरंजन उसेंडी, आर.डी.आत्राम, आनंद कंगाली, दुर्गावती सर्राम, प्रभा पेंदाम, हिरा मडावी उपस्थित राहतील.
१ फेब्रुवारी रोजी, राष्ट्रीय गोंडवाना महाधिवेशनाला सुरुवात होणार असून उद्घाटन महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार करतील. अध्यक्षस्थानी आदिवासी विकास राज्यंमत्री राजे अब्रीशराव आत्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले उपस्थित राहतील. स्वागताध्यक्ष म्हणून आमदार पुराम तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. अशोक उईके, आ. राजू तोडसाम, आ. परिणय फुके, आ. विजय रहांगडाले, आ. देवराव होळी, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.दयानिधी, पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, जि.प.सदस्य सर्वश्री जियालाल पंधरे, विजय टेकाम, माधुरी कुंभरे, रजनी कुंभरे, रोहीणी वरकडे, सुनिता मडावी, भाष्कर आत्राम, अनिल केशमी, कांती केशमी, रमेश कुंभरे, एस.के.मडावी उपस्थित राहतील.
२ फेब्रुवारी रोजी, राष्ट्रीय गोंडी साहित्य महासंमेलन होणार असून उद्घाटन राष्ट्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार सहाय करतील. अध्यक्षस्थानी गोंडी इतिहासकार भरतलाल कोराम राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यकार अनुसूया उईके, चंद्रलेखा कंजाली, सुन्हेरसिंह तारमा, उषाकिरण आत्राम, आनंद मडावी, चेतन मसराम, अंबादास सलामे, गुरुचरण नायक, ए.पी.प्रधान, धनसिंग धुर्वे, प्रकाश सलाम, सुशिला धुर्वे, राहुल टेकाम, मनोजसिंग मडावी, सी.एल.उपस्थित राहतील.
तर ३ फेब्रुवारी रोजी, कचारगड यात्रेचा समारोप होणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन सालेकसा नगर पंचायत अध्यक्ष विरेंद्र उईके यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी गुलाब धुर्वे राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून भोजराज वरकडे, गोविंद वरकडे, पूजा वरकडे, रामचंद धुर्वे, राधेश्याम टेकाम, नरेंद्र मडावी, बाळू मरस्कोल्हे, संतोष मडावी, मोहपत पंधरे, रेंदूलाल मरस्कोल्हे, ब्रिजलाल उईके, भीमराव इळपाते, लासराम उईके, सुमित्रा पूनाराम मरकाम उपस्थित राहतील. कचारगड देवस्थान आदिवासी समाजाचे जन्मस्थळी असून ती आता धर्मस्थळ झाले आहे. त्यामुळे पाच दिवसीय यात्रेदरम्यान या ठिकाणी देशाच्या कोनाकोपºयातून आदिवासी महिला पुरुष, आबालवृद्ध, साहित्यकार, इतिहासकार, ग्रंथकार, अधिकारी-पदाधिकारी सर्वच येथे येवून गोंडी धर्माची दिक्षा घेतात. येथे सर्वस्तरावरील आदिवासी संस्कृतीची ओळख व दर्शन घडून येते.
सगळ्यांच्या स्वागतासाठी कचारगड समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे, उपाध्यक्ष रमनलाल सलाम, सचिव संतोष पंधरे, कोषाध्यक्ष बारेलाल वरकडे व सदस्य मनिष पुसाम, रामेश्वर पंधरे, शंकुतला परते, सुरेश परते, मोहन कुंभरे, फिरतू मडावी, लखन टेकाम, रीस पंधरे, मालीक पंधरे, निजुलाल उईके, शंकर उईके, भगवानसिंह नेताम, सोमलाल नेताम, मोहन मरस्कोल्हे, पारस मरई, नरेश सयाम, सुरेश मडावी, बबलू परते, हिरालाल सिरसाम, रोहीत मडावी, परदेशी नेताम, रमेश नेताम सहकार्य करीत आहेत.
बुधवारी गोंगोबा कोया पूनेम पूजा
माघ पौर्णिमेची महापूजा म्हणजे कोया पूनेम पूजा असून या महापूजेचा शुभारंभ बुधवारी (दि.३१) माघ पौर्णिमेला भूमकला (गोंडी पुजारी) यांच्या हस्ते करण्यात येईल व कोया पूनेम महासंमेलन सुरु होणार. या महासंमेलनाचे उद्घाटन राष्ट्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष माया इनवाते यांच्या हस्ते होईल अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून खा. नागेश घोडाम (आ.प्र.) खा. फग्गनसिंह कुलस्ते (म.प्र.), खा. विक्रम उसेंडी (छ.ग.), डॉ. किशोर कुंभरे (आयुक्त) डॉ. नरेंद्र कोडवते (प्रसिध्द शल्य चिकीत्सक) व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.