कोहिनूर मेश्रामची आयआयएम बेंगलोरसाठी निवड ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:37 AM2021-06-09T04:37:00+5:302021-06-09T04:37:00+5:30

गोंदिया : देशातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या व जागतिक दर्जा प्राप्त असलेल्या बेंगलोर येथील भारतीय प्रबंधन संस्थेत (आयआयएम) येथील पदयुत्तर ...

Kohinoor Meshram selected for IIM Bangalore () | कोहिनूर मेश्रामची आयआयएम बेंगलोरसाठी निवड ()

कोहिनूर मेश्रामची आयआयएम बेंगलोरसाठी निवड ()

googlenewsNext

गोंदिया : देशातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या व जागतिक दर्जा प्राप्त असलेल्या बेंगलोर येथील भारतीय प्रबंधन संस्थेत (आयआयएम) येथील पदयुत्तर उच्च प्रबंधन अभ्यासक्रमासाठी गोंदियातील कोहिनूर कमलेश मेश्राम यांची निवड झाली आहे. देशातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या संस्थेत आपल्या शहरातील विद्यार्थ्यांची निवड झाल्यामुळे गोंदियाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

कोहिनूर कमलेश मेश्राम हा सेल टॅक्स कॉलनी येथील निवासी असून मूळचा तो कटंगी कला येथील रहिवासी आहे. सध्या तो केंद्र शासनाच्या दूरसंचार मंत्रालय सी.डॉट. रिसर्च इंजिनियर पदावर कार्यरत आहे. या पदावर कार्यरत असताना वर्ष २०२० मध्ये त्याची संयुक्त राष्ट्र आंतरिक नेवीगेशन ॲपच्या जिनेवा ( स्विझरलँड) येथे झालेल्या प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. या चमूचे कोहिनूर मेश्राम यांनी प्रतिनिधित्व केले. ही आपल्या देशासाठी महाराष्ट्र व गोंदिया शहरासाठी अभिमानास्पद बाब आहे. सन २०२० मध्ये भारतीय प्रबंधन संस्था बेंगलोरच्यावतीने उच्च पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत कोहिनूर मेश्राम याने प्राविण्य सूचित प्रथम क्रमांक पटकावित आपल्या शहराचा नावलौकिक केला आहे.

.........

सुरुवातीपासून शिक्षणात टॉपर

कोहिनूर हा शिक्षिका कविता व कमलेश मेश्राम यांचा मुलगा असून त्याला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती. बारावीच्या सी.बी.एस.सी.परीक्षेत सुद्धा त्याने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्याच बरोबर त्याला विविध खेळांची सुध्दा आवड आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई वडील व गुरुजनांना दिले आहे. कोहिनूरने प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

.........

काेट

कोहिनूर हा लहानपणापासूनच हुशार आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असताना त्याने संपादन केलेल्या यशाचा आम्हाला अभिमान आहे.

-कमलेश मेश्राम, वडील

फोटो : संयुक्त राष्ट्र जिनेव्हा येथे उपस्थित कोहिनूर मेश्राम.

Web Title: Kohinoor Meshram selected for IIM Bangalore ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.