कोल्हापुरी बंधारे केवळ नावापुरतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 09:32 PM2018-10-29T21:32:42+5:302018-10-29T21:33:06+5:30

तालुक्यातील ग्राम केसलवाडा जवळील काळा गोटा १ व काळा गोटा २ येथे मागील १५ वर्षांपूर्वी दोन कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात आले. ज्यावर्षी बंधारे तयार करण्यात आले त्याच वर्षी पुराच्या तडाख्याने बंधाऱ्याच्या दोन्ही बाजुला खिंड पडली. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी साचून राहण्याऐवजी ते वाहून जात आहे.

Kolhapuri Bandhare only for names | कोल्हापुरी बंधारे केवळ नावापुरतेच

कोल्हापुरी बंधारे केवळ नावापुरतेच

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी सिंचनापासून वंचित : लाखो रुपयांचा खर्च पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : तालुक्यातील ग्राम केसलवाडा जवळील काळा गोटा १ व काळा गोटा २ येथे मागील १५ वर्षांपूर्वी दोन कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात आले. ज्यावर्षी बंधारे तयार करण्यात आले त्याच वर्षी पुराच्या तडाख्याने बंधाऱ्याच्या दोन्ही बाजुला खिंड पडली. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी साचून राहण्याऐवजी ते वाहून जात आहे.
परिणामी शेतकऱ्यांना या बंधाऱ्यांचा कुठलाच उपयोग होत नाही. लाखो रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेले बंधारे सिंचन विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे नावापुरतेच ठरत आहे. सडक-अर्जुनी जवळून वाहणाºया उमरझरी नाल्यावर शासनाचे लाखो रुपये खर्चून काळा गोटा २ व काळा गोटा २ येथे कोल्हापुरी बंधारे बांधले आहेत.
या बंधाºयांमुळे परिसरातील केसलवाडा, वडेगाव-सडक, परसोडी, रेंगेपार, डोयेटोला, नवाटोला, पांढरवानी, सडक-अर्जुनी या गावातील शेतकºयांना सिंचनासाठी मदत होत होती.
मात्र या बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले त्याचवर्षी याला पुराचा तडाखा बसला. मात्र त्यानंतर संबंधित विभागाने बंधाऱ्यांची दुरूस्ती केली नाही.
त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी वाहुन जात असून याचा शेतकऱ्यांना कुठलाच फायदा होत नाही. पूर्वी बंधाऱ्याच्या मदतीने शेतकरी रब्बी हंगाम करीत होते. तसेच परतीच्या पावसाने दगा दिल्यास बंधाºयांची मोठी मदत शेतकऱ्यांना होत होती. मात्र जि.प.लघू पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने या बंधाºयांचा कुठलाच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.
या बंधाºयांची डागडूजी केल्यास १५ फूट पाणी साचून राहू शकते. त्यामुळे पाळीव प्राणी व वन्य प्राण्यांच्या पिण्याचा पाण्याची सोय व शेतकऱ्यांना सिंचनास मदत होवू शकते. तालुक्याला लागून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे. व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांना पिण्याचा पाण्याची सोय होवू शकते.
बंधाऱ्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
तालुक्यातील खडकी-बामणी, डोंगरगाव, शेंडा, जांभळी, पांढरी, सौंदड, कोकणा जमिदारी, डुग्गीपार, सिंदिपार, कोसमतोंडी, डव्वा, कोदामेडी, मनेरी, घोटी, मालिजुंगा, मुरपार, पळसगाव आदी ठिकाणी तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या देखभाल दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या बंधाºयांचा शेतकºयांना कुठलाच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.

Web Title: Kolhapuri Bandhare only for names

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.