कोल्हापुरी बंधाºयाला लागले कठडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:40 PM2017-10-30T22:40:52+5:302017-10-30T22:41:07+5:30
सौंदड ते राका मार्गावर असलेल्या चुलबंद नदीवरील कोल्हापुरी बंधाºयाला अखेर कठडे व गेटला पाट्या लागल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
सौंदड : सौंदड ते राका मार्गावर असलेल्या चुलबंद नदीवरील कोल्हापुरी बंधाºयाला अखेर कठडे व गेटला पाट्या लागल्या. ‘लोकमत’ने पुलाचे कठडे व गेटच्या पाट्यांचा विषय बातमीच्या माध्यमातून प्रकाशात आणला होता. अखेर ‘लोकमत’च्या बातमीमुळे संबंधीत विभागाने दखल घेत पुलावर कठडे व गेटच्या पाट्या लावल्या.
२०१४ मध्ये पावसाच्या अतिवृष्टीमुळे पुलाला लावलेले कठडे तथा लोखंडी पाट्या पाण्यात वाहून गेल्या होत्या. तर काही पाट्या चोरीला गेल्या होत्या. परिणामी या पुलावरुन ये-जा करणाºया नागरिकांना धोकादायक वाटत होते. तर लोखंडी पाट्या उपलब्ध नसल्यामुळे नदीचे पाणी अडवता आले नाही.
परिणामी नागरिकांना पिण्यासाठी व शेतीकरिता पाण्याची भटकंती होत होती. याच ‘लोकमत’ने बातमीच्या माध्यमातून सततचा पाठपुरावा केला. बातम्यांची दखल घेत संबंधीत विभागाने पुलाला कठडे आणि गेटला लोखंडी पाट्या लावल्या. आता या बंधाºयामध्ये भरपूर पाणीसाठा उपलब्ध झाला असून शेतकºयांचे प्रश्न सुटले आहे.