सामाजिक न्याय मंत्र्याच्या कार्यक्षेत्रात कोमलप्रसाद न्यायापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:17 IST2019-01-28T00:15:13+5:302019-01-28T00:17:09+5:30
तालुक्यातील भडंगा येथील शेतकरी कोमलप्रसाद कटरे यांनी शासन दरबारी आपल्या चार मागण्यांना घेऊन २५ जानेवारीपासून येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तीन दिवसाचा कालावधी लोटूनही प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही.

सामाजिक न्याय मंत्र्याच्या कार्यक्षेत्रात कोमलप्रसाद न्यायापासून वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यातील भडंगा येथील शेतकरी कोमलप्रसाद कटरे यांनी शासन दरबारी आपल्या चार मागण्यांना घेऊन २५ जानेवारीपासून येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तीन दिवसाचा कालावधी लोटूनही प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे सामाजिक न्याय मंत्र्याच्या कार्यक्षेत्रातच कोमलप्रसाद न्यायापासून वंचित असल्याचे चित्र आहे.
कोमलप्रसाद कटरे यांनी चार मागण्यांना घेवून उपोषण सुरू केले असून त्यात सन २०१२-१३ मध्ये न्याय देण्यास प्रशासनाने विलंब केल्यामुळे (पुंजण्याची नासधुस झाल्यामुळे) ते चुरणी करु शकले नाही. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी, राजस्व विभागाच्या चुकीमुळे रेकार्ड दुरुस्तीला पाच वर्षे लावल्यामुळे सतत पाच वर्षे गट न.५५२ ची शेती आरजी १.०२ हे.आर. शेती पडीक राहिल्यामुळे झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी. रेकार्ड दुरुस्तीला चार वर्षे विलंब लावणाऱ्या अधिकाºयावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, पाच वर्षे धावपळ व मानसिक त्रासासाठी आलेला खर्च देण्यात यावा. या चार मागण्यांना घेऊन आमरण उपोषण सुरु केले आहे. कटरे यांनी गेल्या सहा वर्षात पाच आमरण उपोषणे, एकदा पाणी टॉकीवर विरुगिरी केली आहे. आता पुन्हा आमरण उपोषणावर बसून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे. कटरे यांनी प्रथम शेतात जाण्यासाठी रस्ता देण्याच्या मागणीला घेऊन उपोषण केले होते. शेवटी हतबल झालेल्या प्रशासनाने कोमलप्रसादला न्याय देत रस्ता तयार करून दिला. शेतालगतच्या ०.१४ हे.आर. ह्या विवादित जागेवरुन रस्ता मोकळा झाला. पण या प्रक्रियेसाठी प्रशासनाने चार ते पाच वर्षे लावले. त्यामुळे कोमलप्रसादचे संपूर्ण आयुष्य उध्ववस्त झाले. प्रशासनाचे उंबरठे झिजवित वेळ खर्ची झाला, मानसिक त्रास झाला. त्याची भरपाई मिळाली पाहिजे, आणि ज्या अधिकाºयामुळे हा सर्व प्रकार घडला त्या अधिकाºयावर कारवाई करण्यात यावी, अशी कोमलप्रसादची मागणी आहे.