कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांना चपलाने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:28 AM2021-04-17T04:28:29+5:302021-04-17T04:28:29+5:30

गोंदिया : डुग्गीपार पोलीस ठाण्यांर्तगत येणाऱ्या कोविड केअर सेंटर आदिवासी मुलांचे वसतिगृह सडक अर्जुनी येथे कोरोना चाचणीचा अहवाल का ...

Kovid Center staff slapped | कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांना चपलाने मारहाण

कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांना चपलाने मारहाण

Next

गोंदिया : डुग्गीपार पोलीस ठाण्यांर्तगत येणाऱ्या कोविड केअर सेंटर आदिवासी मुलांचे वसतिगृह सडक अर्जुनी येथे कोरोना चाचणीचा अहवाल का देत नाही म्हणून एका इसमाने तेथील कर्मचाऱ्यांना चपलाने मारहाण केली. ही घटना १५ एप्रिलच्या सकाळी ११ ते दुपारी ३.४५ वाजता दरम्यान घडली. कोहमारा येथील आरोपी दिनेश श्रीराम मसराम (३५) हा कोविड केअर सेंटर आदिवासी मुलांचे वसतिगृह सडक अर्जुनी येथे येऊन कोरोना चाचणीचा अहवाल द्या असे बोलून गेटला लाथ मारून आतमध्ये प्रवेश केला. तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण करीत असताना भांडण सोडविण्यासाठी डव्वा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी विनोद घनश्याम भुते (४१) गेले असताना आरोपीने चपलाने व थापडबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली. डुग्गीपार पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ भादंवि गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भुरले करीत आहेत.

Web Title: Kovid Center staff slapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.