शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल ‘कृषीक’ ॲप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:20 AM2021-06-11T04:20:39+5:302021-06-11T04:20:39+5:30
हे मोबाईल ॲप पिकांना किती खतमात्रा द्यावी व त्यासाठी येणारा खर्च, विद्यापीठाने केलेली पीकनिहाय खतमात्रांची शिफारस याबाबत संपूर्ण माहिती ...
हे मोबाईल ॲप पिकांना किती खतमात्रा द्यावी व त्यासाठी येणारा खर्च, विद्यापीठाने केलेली पीकनिहाय खतमात्रांची शिफारस याबाबत संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देतो. त्याचबरोबर कृषी विषयक इतर महत्वपूर्ण माहिती जसे हवामान, कृषी वार्ता, पशु सल्ला, कृषी सल्ला, डेअरी, बाजारभाव, खत गणकयंत्र, कृषिकतज्ञ, उत्पादने, शंका, कृषी योजना इत्यादी महत्वपूर्ण माहिती उपलब्ध करुन देतो. तरी शेतकरी बांधवाना असे आवाहन करण्यात येते की, सदर ॲप गुगल प्ले स्टोअर वर ‘कृषीक’ असे टाईप करुन ॲप इन्स्टाल करुन घ्यावे व शिफारस केलेलीच खतमात्रा पिकांना देऊन अनावश्यक खतांचा वापर टाळावा व उत्पादन खर्चात बचत करावी. कृषी ॲप बाबत अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अथवा संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क करावा.