कुणबी समाज संघटनेने रक्तदान करून जोपासली सामाजिकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:47 AM2021-05-05T04:47:34+5:302021-05-05T04:47:34+5:30
गोंदिया : झाडे कुणबी समाज संघटना, गोंदियाच्यावतीने ३ मे रोजी आयोजित रक्तदान शिबिरात देवराम मोतीराम चुटे व त्यांचे ...
गोंदिया : झाडे कुणबी समाज संघटना, गोंदियाच्यावतीने ३ मे रोजी आयोजित रक्तदान शिबिरात देवराम मोतीराम चुटे व त्यांचे सहकारी राकेश कोरे यांनी बाई गंगाबाई रुग्णालय, गोंदिया येथे जाऊन रक्तदान केले. समाजाच्या इतर युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून स्वेच्छेने रक्तदान केले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, झाडे कुणबी समाज संघटना अध्यक्ष चंद्रकुमार चुटे, सचिव कुंदा दोनोडे उपस्थित होते. ज्यांनी कोरोनाला पराभूत केले. त्यांना आता दोन जीव वाचवण्याची संधी आहे. प्लाझ्मा दान केल्याने कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही, अशा परिस्थितीत झाडे कुणबी समाज सचिव नीलेश चुटे, कोअर कमिटीचे पदाधिकारी प्रभाकर दोनोडे, गजाजन डोये, काशीराम हुकरे, रामू चुटे, राजेंद्र पाथोडे, नितेश दोनोडे, सुरेश बहेकार, चिराग फुंडे, विजय बहेकार यांनी कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. परदेशानंतर भारतात प्लाझ्मा थेरपीच्या सकारात्मक निकालानंतर आयसीएमआरने त्याला मान्यता दिली आहे. ही थेरपी गंभीर कोरोना रुग्णांसाठी वापरली जाते. ज्यांनी त्यांचा प्लाझ्मा पुनर्प्राप्त केला आहे त्यांना ॲन्टीबॉडीज आहेत. मग जेव्हा हा प्लाझ्मा एखाद्या रुग्णाला देण्यात येतो तेव्हा ॲन्टीबॉडीज रुग्णाच्या शरीरात पोहोचतात आणि कोरोना व्हायरसशी लढायला लागतात. यामुळे रुग्णाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे चंद्रकुमार चुटे, डॉ. नोव्हील ब्राम्हणकर, प्राचार्य दीप्ती तावाडे, सचिव नीलेश चुटे, सुजता बहेकार, राजेश दोनोडे, राजेश हुकरे, गौरव बहेकार, राहुल खोटेले, मुन्ना कोरे, वसंता चुटे, विकास खोटेले, निखिल भंडारकर, अंकित डोये, मीना पाथोडे, सरोज फुंडे, भूमिका हुकरे, चारु भांडारकर यांनी कळविले आहे.