नगर परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध होणार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:23 AM2018-06-04T00:23:06+5:302018-06-04T00:23:06+5:30

आपल्या घरातील एखादे काम करावयाचे असल्यास सध्या शहरातील बाजार परिसरात असलेल्या मजूर चौकातून मजूर मिळविले जातात. यासाठी संबंधीताला मजुराशी बोलणी करून मजुरी तय करावी लागते व त्यानंतर तो मजूर कामावर जातो.

Labor will be available through the Municipal Council | नगर परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध होणार मजूर

नगर परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध होणार मजूर

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान : लवकरच होणार कार्यालयाची स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आपल्या घरातील एखादे काम करावयाचे असल्यास सध्या शहरातील बाजार परिसरात असलेल्या मजूर चौकातून मजूर मिळविले जातात. यासाठी संबंधीताला मजुराशी बोलणी करून मजुरी तय करावी लागते व त्यानंतर तो मजूर कामावर जातो. मात्र आता या पद्धतीत बदल होणार असून नगर परिषदेच्या माध्यमातून मजूर उपलब्ध करवून दिले जाणार आहे. दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत हे प्रयोग केला जाणार आहे. यासाठी लवकरच कार्यालयाची स्थापना केली जाणार असून तेथून कुशल व अकुशल अशा दोन्ही प्रकारच्या मजुरांची पुर्तता केली जाणार आहे.
शहराच्या भाजी बाजारात मजूर चौक आहे. दररोज सकाळी येथे मोठ्या प्रमाणात मजूर जमा होतात. ज्यांना मजूरांची गरज असते ते या चौकात येतात व मजुरांशी बोलणी करून घेऊन जातात.
या मजूर चौकाची विशेषता अशी की, येथे फक्त मजूरच मिळत नसून प्रत्येकच कामात तरबेज कारागीर मिळतात. देशातील बहुतांश शहरातील हीच स्थिती आहे. मात्र भविष्यात शहरात सुरू असलेली परंपरा बदलणार असून मजूर चौक जवळील टाऊन स्कूलमध्ये स्थानांतरीत होऊ सकते.
त्याचे असे की, राज्य शासनाच्या दीनदयाल अंत्योदय योजनेंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान राबविले जात आहे. या अभियानाचे कार्यालय नगर परिषदेच्या टाऊन स्कूलमध्ये असून ही योजना नगर परिषदेच्या माध्यमातून राबविली जात आहे.
शासनाच्या या योजनेंतर्गत शहर उपजिवीका केंद्राचे गठन केले जात आहे. हे केंद्र कार्यालयाच्या खाली रिकाम्या भवनात देण्याचे निश्चीत करण्यात आले आहे. असे झाल्यास शहरातील सर्वच मजुर या कार्यालयाशी जुळतील.
या अभियानाचे व्यवस्थापक बनकर यांच्यानुसार, या भवनातील चार खोल्यांना एकत्र जोडण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाला लवकरच प्रस्ताव पाठविण्याची तयारी असून त्यानंतरच काम केले जाईल.
अशी राहणार उपजीविका केंद्राची व्यवस्था
शहरातील या उपजीविका केंद्राला कौशल्य विकास केंद्र बनविले जाणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्या नंतर कौशल्य विकास उपलब्ध करविण्याच्या दिशेने काम सुरू झाले आहे. याच योजनेला पुढे वाढवित या केंद्रात कौशल्य आधारीत कारागिर एकत्र जोडले जातील. यातंर्गत प्लंबर, मिस्त्री, मजूर, वेल्डर, कारपेंटरसह कुशल मजुरांना जोडले जाईल. प्रत्येक क्षेत्रातील किमान १०० कारागिरांची यादीच केंद्रात उपलब्ध राहील. यात त्यांच्यासोबत एक करार केला जाईल. एवढेच नव्हे तर कंत्राटदारांसोबतही या कारागिरांच्या सेवेबाबत करार केला जाईल. यामुळे सर्वसामान्यांसह कंत्राटदारांना निश्चीत दरात कारागिर उपलब्ध होतील व या मोबदल्यात कंत्राटदारांना एक रक्कम केंद्राला द्यावी लागेल. सोबतच या केंद्रात बचतगटांच्या विक्री केंद्राचीही स्थापना केली जाणार आहे. या केंद्राला एक टोल फ्री क्रमांक दिला जाणार असून या क्रमांकावर संपर्क केल्यास मजूर उपलब्ध करवून दिले जाईल.

Web Title: Labor will be available through the Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.