गोसेखुर्द पर्यटकांसाठी सुविधाचा अभाव

By admin | Published: August 2, 2016 11:18 PM2016-08-02T23:18:47+5:302016-08-02T23:18:47+5:30

महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द पूर्णत्वाच्या मार्गावर असून येथे लाखो पर्यटकांची हजेरी लावत असतात परंतू गोसे प्रकल्पस्थळी पर्यटकांसाठी....

Lack of facilities for Gosekhurd tourists | गोसेखुर्द पर्यटकांसाठी सुविधाचा अभाव

गोसेखुर्द पर्यटकांसाठी सुविधाचा अभाव

Next

चिचाळ : महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द पूर्णत्वाच्या मार्गावर असून येथे लाखो पर्यटकांची हजेरी लावत असतात परंतू गोसे प्रकल्पस्थळी पर्यटकांसाठी कुठल्याही मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागतो.
प्रकल्पस्थळी महाराष्ट्रातील शैक्षणिक सहली व इतर पर्यटक प्रकल्पाचे नयन मनोहर दृश्य पाहण्यासाठी येत असतात परंतू या ठिकाणी पिण्याचे पाणी, जेवण व नास्तासाठी कुठलीही व्यवस्था नाही तसेच पर्यटकांना विश्रामासाठी विश्रामगृह तसेच आकर्षित करणाऱ्या एखादे गार्डनची सुविधा उपलब्ध नाही तसेच अवती भवती वृक्षांची लागवड केली नसल्याने उन्हाळ्यामध्ये पर्यटक ये-जा करतात. महिला व पुरूषासाठी प्रसाधन व मुतारीचे व्यवस्था नसल्याने महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होते.
सध्यास्थितीत गोसेखुर्द धरणात पाणीसाठी अधिक आहे. त्यामुळे वातावरण निसर्गरम्य वातावरणासह आल्हाददायक वाटत आहे, असे असले तरी येथे सुरक्षा रक्षकांचा अभाव असल्याने पर्यटकांचा जीव धोक्यात आहे. येथे सुरक्षा असणे आवश्यक आहे. (वार्ताहर)

Web Title: Lack of facilities for Gosekhurd tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.