माहितीअभावी विद्यार्थी पोहोचले शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:27 AM2021-03-21T04:27:26+5:302021-03-21T04:27:26+5:30

रावणवाडी : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या ३१ तारखेपर्यंत सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश काढले असून, त्याची ...

Lack of information reached the school | माहितीअभावी विद्यार्थी पोहोचले शाळेत

माहितीअभावी विद्यार्थी पोहोचले शाळेत

googlenewsNext

रावणवाडी : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या ३१ तारखेपर्यंत सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश काढले असून, त्याची अंमलबजावणी शनिवारपासून (दि.२०) करण्यात आली. मात्र याबाबत कित्येक विद्यार्थ्यांना माहिती नसल्याने विद्यार्थी शाळेत पोहोचले होते. त्यांना याबाबत माहिती देऊन परत पाठविण्यात आले.

राज्यात कोरोनाने कहर केला असून, आता जिल्ह्यातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशात सुरक्षात्मक पाऊल म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.१९) जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविदयालये येत्या ३१ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले. या आदेशाची अंमलबजावणी शनिवारपासून (दि.२०) करावयाची होती. त्यानुसार शाळा-महाविद्यालय उघडण्यात आले नाही. मात्र तडकाफडकी निघालेल्या या आदेशाबाबत माहिती नसल्याने जिल्हा परिषद तसेच काही खासगी शाळांतील कित्येक विद्यार्थी व शिक्षक शनिवारी शाळेत पोहोचल्याचे आढळले. शाळा बंद असल्याने काही वाट बघून ते परतून गेले, तर काही ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माहिती देऊन परत पाठविले. जिल्ह्यातील काही शाळांतील विद्यार्थी बाधित झाल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. पालक आपल्या पाल्यांना मास्क लावून शाळेत पाठवितात. शाळा बंद असल्याच्या माहितीअभावी शनिवारी चारगाव, मुरपार, रावणवाडी, सिरपूर व मोगर्रा येथील जिला परिषद शाळेतील विद्यार्थी मास्क न लावताच आढळले.

-------------------------------

पालकांनी लक्ष देण्याची गरज

शाळांना आता सुटी लागली असून, पालकांना आता आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. पाल्यांनी बाहेर कोठेही जाताना मास्क लावला की नाही, हे बघावे. तसेच पालकांनी आता आपल्या पाल्यांना कोरोनाबाबत माहिती देऊन त्यासाठी असलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना प्रेरित करण्याची गरज आहे.

Web Title: Lack of information reached the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.