ढिसाळ नियोजनाने लाखो लीटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:36 AM2018-04-14T00:36:48+5:302018-04-14T00:36:48+5:30

एकीकडे जिल्ह्यातील जनता पाणी टंचाईच्या समस्येने चिंताग्रस्त असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. आसोली आणि आंभोऱ्याजवळ गुरूवारी (दि.१२) कालवा फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला शिवाय पाणी टंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे.

Lack of millions of liters of waste water for poor planning | ढिसाळ नियोजनाने लाखो लीटर पाण्याचा अपव्यय

ढिसाळ नियोजनाने लाखो लीटर पाण्याचा अपव्यय

Next
ठळक मुद्देदोन ठिकाणी फुटला कालवा : दुरूस्तीचे काम सुरू, पाणी टंचाईची समस्या गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : एकीकडे जिल्ह्यातील जनता पाणी टंचाईच्या समस्येने चिंताग्रस्त असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. आसोली आणि आंभोऱ्याजवळ गुरूवारी (दि.१२) कालवा फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला शिवाय पाणी टंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे.
गोंदिया शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय १० एप्रिलला घेतला. त्यानंतर ११ एप्रिलला पुजारीटोलाचे पाणी सोडण्यात आले. हे पाणी कालव्याव्दारे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जाणार आहे. यामुळे शहराला नियमित पाणी पुरवठा करणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला शक्य होणार आहे. मात्र पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग आणि सिंचन विभाग यांच्यात योग्य समन्वय केले नाही. कालव्यात पाणी सोडण्यापूवी कालव्यांची स्थिती योग्य आहे का? याची चाचपणी सिंचन विभागाने केली नाही. दरम्यान पुजारीटोला धरणातून २५० क्यूसेक पाणी सोडल्यानंतर हे पाणी सालेकसा तालुक्यातील आंभोºयाजवळ पोहचले तर यापासूनच काही अंतरावर असलेल्या आसोलीजवळ पाणी पोहचल्यानंतर कालव्याला मोठे भगदाड पडले. त्यामुळे लाखो लीटर पाणी शेतांमध्ये वाहून गेले. परिणामी डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत गुरूवारी (दि.१२) पाणीच पोहचले नाही. त्यामुळे गोंदिया शहराच्या पाणी टंचाईच्या समस्येत आणखी भर पडली. प्रकल्पाचे पाणी सोडण्यापूर्वी या विभागाने योग्य नियोजन केले असते तर लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला नसता असे बोलले जात आहे. आंभोरा आणि आसोलीजवळ कालव्याला मोठे भगदाड पडले असून त्याची दुरूस्ती करण्यासाठी किमान तीन चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. मात्र सिंचन विभागाचे अधिकारी शुक्रवारी (दि.१३) सायंकाळपर्यंत दुरूस्तीचे काम पूर्ण होण्याचा दावा करित आहे. मात्र यासर्व प्रकारामुळे पुन्हा एकदा या तिन्ही विभागाच्या ढिसाळ नियोजनाची पोलखोल झाली आहे.
चूक प्रशासनाची फटका शहरवासीयांना
पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी प्रशासनाने योग्य नियोजन केल्याने शहरावरील पाणी टंचाईच्या संकटात अधिक वाढ झाली आहे. मागील महिनाभरापासून शहरात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने पाण्यासाठी शहरवासीयांची भटकंती सुरू आहे. त्यातच कालवा फुटल्यामुळे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पाणी पोहचण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला अजून काही दिवस तोंड द्यावे लागणार आहे.
अतिआत्मविश्वास नडला
दोन महिन्यापूर्वीच भूजल सर्वेक्षण विभागाने संभाव्य पाणी टंचाईची शक्यता वर्तविली होती. त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला होता. तेव्हाच प्रशासन उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र जेव्हा पाणी टंचाईची समस्या गंभीर होईल तेव्हाच उपाय योजना करु असा आत्मविश्वास जिल्हा प्रशासन आणि मजीप्राच्या अधिकाºयांनी बाळगला. त्यामुळे शहरवासीयांना आता पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

Web Title: Lack of millions of liters of waste water for poor planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.