नियोजनाअभावी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:32 AM2021-08-12T04:32:45+5:302021-08-12T04:32:45+5:30
केशोरी : स्थानिक ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी कनेरी केशोरी या गावातील पाण्याची टाकी अनेकदा ओव्हरफ्लो होवून पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. ...
केशोरी : स्थानिक ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी कनेरी केशोरी या गावातील पाण्याची टाकी अनेकदा ओव्हरफ्लो होवून पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. सार्वजिनक नळ सोडण्याची वेळ निश्चित नसल्यामुळे कोणत्याही वेळात गावातील सार्वजनिक नळ सोडत असल्यामुळे महिलांना कमालीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
ग्रामपंचायत प्रती महिलांचा राेष वाढत आहे. सार्वजनिक नळाद्वारे गावात पिण्याचा पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात कनेरी केशोरी येथील पाणी टाकीची क्षमता अपुरी पडत असल्याने दोन वेगवेगळ्या पाणी टाकी तयार करण्यात आल्या आहेत. त्याही पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी असल्याचे सांगून घरगुती नळ आणि सार्वजनिक नळांना पाणी सोडण्याची वेळ निश्चित नाही. वेळी-अवेळी केव्हाही पिण्याच्या पाण्याचे नळ सुरु करीत असल्यामुळे महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. टाकीमध्ये पाणी भरताना टाकीची क्षमता न पाहता पाणी भरत असल्यामुळे पाण्याची टाकी सतत ओव्हरफ्लो होवून पाणी वाया जाण्याचे प्रकार सुरु आहे. सार्वजनिक नळांना तोट्या लावल्या नसल्यामुळे सतत नळ सुरु असतात. त्यातूनही पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. याकडे ग्रामपंचायतीचा अजीबाबत लक्ष नाही. एखाद्या वेळेस ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हटकले असता त्यांच्याकडून अधिकाऱ्यांसारखे उत्तर मिळत असतात. हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांनी वेळीच लक्ष देवून पाण्याच्या टाकीमधून आणि सार्वजनिक नळामधून होणारा पाण्याचा अपव्यय थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.