गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपदी लायकराम भेंडारकर
By अंकुश गुंडावार | Updated: January 24, 2025 13:53 IST2025-01-24T13:37:23+5:302025-01-24T13:53:11+5:30
Gondia : जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षांकरिता अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाकरीता निवडणूक

Laikaram Bhendarkar appointed as ZP President
गोंदिया :जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षांकरिता अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाकरीता शुक्रवारी (दि.२४) जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाकडून अध्यक्ष पदाकरीता जि.प.चे गटनेते लायकराम भेंडारकर यांची निवड पक्षाने केली असून ते अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जि.प.सदस्य सुरेश हर्षे यांची निवड निश्चित झाली आहे.
चोरखमारा येथे झालेल्या बैठकीत भाजपचे पर्यवेक्षक आमदार गिरीश व्यास,संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, आमदार डाॅ. परिणय़ फुके, भाजपचे आमदार विजय रहागंडाले,आमदार विनोद अग्रवाल,आमदार संजय पुराम,भाजप जिल्हाध्यक्ष डाॅ.येशुलाल उपराडे,संघटनमंत्री बाळा अंजनकर व भाजपच्या जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाकरीता भाजपचे जि.प.गटनेते लायकराम भेंडारकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. आज दुपारी चार वाजता विशेष सभेनंतर याची घोषणा केली जाणार आहे.