लेक लाडकी पुन्हा रूसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 09:19 PM2018-04-28T21:19:37+5:302018-04-28T21:19:37+5:30

शासन ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानावर भर देत आहे. परंतु गोंदिया जिल्ह्यात हे अभियान केवळ कागदावरच राबविले जात असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात सतत घट होत असल्याने भविष्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

Lake Factus reverberates | लेक लाडकी पुन्हा रूसली

लेक लाडकी पुन्हा रूसली

Next
ठळक मुद्देमुलींच्या जन्मदरात घट : ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियान कागदावरच

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासन ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानावर भर देत आहे. परंतु गोंदिया जिल्ह्यात हे अभियान केवळ कागदावरच राबविले जात असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात सतत घट होत असल्याने भविष्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. दरवर्षी मुलींच्या जन्मदरात घट होत आहे. सद्यस्थितीत एक हजार मुलांमागे ९३२ मुली असे प्रमाण आहे.
मुलगा मुलगी एक समान, मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी, असे कितीही म्हटले जात असले तरी अद्यापही समाजात मुलींना मुलांच्या बरोबरीचे स्थान दिले जात नसल्याचे विदारक चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी शासन व प्रशासनातर्फे विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र त्याचा फारसा फरक पडलेला नाही. मुलींचा जन्मदर सुधारण्यासाठी सरकारतर्फे सुकन्या योजना, मेरी बेटी भाग्यश्री सारख्या योजना राबविल्या जात आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून या योजनांची अंमलबजावणी आणि जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात नसल्याने मुलींच्या जन्मदरात सातत्याने घट होत आहे. ग्रामीण भागात स्त्री भू्रणहत्या होत असल्याचा संशय सुध्दा बळावला आहे. त्यामुळे मुलींच्या जन्मदरात घट झाली आहे. जिल्ह्यात मुलींचा जन्मदर सन २०१६ मध्ये सर्वाधिक होता. एक हजार मुलांमागे ९९७ मुली असे प्रमाण होते. मात्र यानंतरचा आढावा घेतला तर सन २०१० मध्ये ९२९, २०११ मध्ये ९५४, व सन २०१२ मध्ये ९२९ मुलींचा जन्मदर होता. सन २०१४ मध्ये ९४४, २०१५ मध्ये ९३३, त्यानंतर २०१७ मध्ये ९३३ तर २०१८ मध्ये ९३२ मुलींचा जन्मदर आहे.
आदिवासी व नक्षल प्रभावित गोंदिया जिल्ह्याचा मुलींचा जन्मदर देशात व राज्यापेक्षा अधिक आहे. परंतु दिवसेदिवस होत असलेली घट चिंतेचा विषय ठरत आहे. जिल्ह्यात महिला-पुरुष जन्मदर सन १९९१ मध्ये ९९५, २००१ मध्ये १००५ होता, २०११ मध्ये ९९६ होता. परंतु ६ वर्षात मुलींच्या जन्मदरात घट झाली आहे. १९९१ मध्ये ९७८, २००१ मध्ये ९५८, २०११ मध्ये ९४४ होता. जिल्ह्यात २००१ मध्ये मुलींच्या जन्मदराची चांगली स्थिती होती. त्यानंतर मुलींच्या जन्मदरात सतत घट झाली आहे. सन २०१८ मध्ये सर्वात कमी ९३२ जन्मदर आहे. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी उपाय योजना करण्याची गरज आहे.
देवरी तालुक्यात मुलींचा जन्मदर कमी
जिल्ह्यात देवरी तालुक्यात सर्वात चिंताजनक स्थिती आहे. नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल तालुक्यात एक हजार मुलांमागे ८७० मुली असा जन्मदर आहे. गोरेगाव तालुक्यात ९०८ व तिरोडा तालुक्यात ९१६ मुलींचा जन्मदर आहे. पाच तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक मुलींचा जन्मदर आहे. सडक-अर्जुनी ९७६, सालेकसा ९६९, अर्जुनी-मोरगाव ९६०, आमगाव ९३९ व गोंदिया ९३५ मुलींनी जन्म दर आहे. जिल्ह्यात सन २०१७-१८ मध्ये ९ हजार १७० मुलांनी तर ८ हजार ५४६ मुलींचा जन्मदर आहे.

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी लोकांची मानसिकता बदलण्याची खरी गरज आहे. आज मुली शिकून मोठ्या पदावर जात आहे. त्यामुळे मुलगा मुलगी असा भेदभाव न करता त्यांना समान दर्जा देण्याची गरज आहे.
-अर्चना वानखेडे
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदिया.

Web Title: Lake Factus reverberates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.