आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 11:59 PM2018-08-11T23:59:25+5:302018-08-12T00:00:11+5:30

शहरातील इलेक्ट्रॉनिक सामानाचे व्यापारी प्रकाश एसंजीचे संचालक प्रकाश गोलानी यांच्या गोदामाला शुक्रवारी (दि.१०) रात्री ८ वाजतादरम्यान आग लागली. रात्री सुमारे १२ वाजतादरम्यान या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Large amount of damage to the fire | आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान

आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देरात्री ११ वाजता आगीवर नियंत्रण : शॉट सर्किटने आग लागल्याची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील इलेक्ट्रॉनिक सामानाचे व्यापारी प्रकाश एसंजीचे संचालक प्रकाश गोलानी यांच्या गोदामाला शुक्रवारी (दि.१०) रात्री ८ वाजतादरम्यान आग लागली. रात्री सुमारे १२ वाजतादरम्यान या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सिंधी कॉलनीत गोलानी यांचे इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे गोदाम आहे. याच गोदामाला शुक्रवारी (दि.१०) रात्री ८ वाजतादरम्यान अचानक आग लागली. बघता-बघता आगीने प्रचंड भडका घेतला. लगेच अग्निशमन विभागाला माहिती दिली असता अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले.
मात्र आग भडकत असल्याचे बघून अदानी व लगतच्या बालाघाट येथून वाहन बोलाविण्यात आले. मात्र रात्री सुमारे १२ वाजतादरम्यान गोंदियाच्या पथकानेच आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र या आगीत गोलानी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. मात्र नुकसानीचा आकडा ते सोमवारी देणार असल्याचे अग्निशमन विभागाकडून कळले.

Web Title: Large amount of damage to the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.