लायन्स क्लबच्या वतीने नि:शुल्क भोजनसेवेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:27 AM2021-03-24T04:27:00+5:302021-03-24T04:27:00+5:30

या नि:शुल्क भोजन सेवा कार्याचा शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लबचे चार्टर अध्यक्ष विकी कटकवार हे होते. याप्रसंगी नागपूर लायन्स ...

Launch of free meals on behalf of the Lions Club | लायन्स क्लबच्या वतीने नि:शुल्क भोजनसेवेला सुरुवात

लायन्स क्लबच्या वतीने नि:शुल्क भोजनसेवेला सुरुवात

googlenewsNext

या नि:शुल्क भोजन सेवा कार्याचा शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लबचे चार्टर अध्यक्ष विकी कटकवार हे होते. याप्रसंगी नागपूर लायन्स क्लब गोंदियाचे व्ही.डी.जी. राजेंद्रसिंग बग्गा, राजा भोसले, बालुराम अग्रवाल, राजेश्वर कनोजीया, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा फटिंग, देवरी लायन्स क्लबच्या अध्यक्ष चरणजीतकौर भाटिया, सचिव लक्ष्मीताई पंचमवार, कोषाध्यक्ष ज्योती रामटेककर, आफताब शेख उर्फ अन्नुभाई, पारस कटकवार, अमृतपालकौर भाटिया, मनोज मेश्राम, पुष्पा धुर्वे, पूजा गहाणे, सुधा अग्रवाल, हिवराज मेश्राम, स्वाती मेश्राम, सुमन बिसेन, ऊर्मिला परिहार, सुनीता अग्रवाल, संजीवनी क्लब गोंदियाच्या अध्यक्ष योजना कोतवाल यांच्यासह नागपूर, गोंदिया व देवरी लायन्स क्लबचे इतर पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. या वेळी कोरोना विषाणूच्या संसर्गकाळात क्लबद्वारे समाजात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मंदीपल क्लबच्या वतीने लायन्स क्लब देवरीच्या माजी अध्यक्ष विकी कटकवार यांना प्रमाणपत्र प्रदान करून स्वागत करण्यात आले. लायन्स क्लबचे सदस्य तथा नगरपंचायतचे माजी उपाध्यक्ष आफताब शेख उर्फ अन्नूभाई यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मंदीपल क्लबच्या वतीने पिन भेट देऊन स्वागत व सत्कार केला. दरम्यान, देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना लायन्स क्लबच्या वतीने आयोजित नि:शुल्क भोजन सेवा अतिथींच्या हस्ते दररोज सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लबचे सदस्य पारस कटकवार यांनी तर संचालन क्लबचे मल्टी मीडिया डिस्ट्रीक्ट चेअर पर्सन प्रतीक कदम यांनी केले. उपस्थितांचे आभार क्लबचे सदस्य आफताब शेख उर्फ अन्नूभाई यांनी मानले.

Web Title: Launch of free meals on behalf of the Lions Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.