प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या चित्ररथाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2017 01:18 AM2017-03-30T01:18:39+5:302017-03-30T01:18:39+5:30

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, गरजू व्यक्ती व महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखिवणाऱ्या प्रधानमंत्री मुद्रा बँक

Launch of painting of Prime Minister Money Scheme | प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या चित्ररथाचा शुभारंभ

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या चित्ररथाचा शुभारंभ

googlenewsNext

गोंदिया : सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, गरजू व्यक्ती व महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखिवणाऱ्या प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या चित्ररथाचा शुभारंभ २७ मार्च रोजी तिरोडा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बचतगटाच्या महिला मुद्रा बँक योजना मेळाव्यात पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
यावेळी आ. विजय रहांगडाले, तिरोडाच्या नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, पं.स.सभापती उषा किंदरले, उपसभापती किशोर पारधी, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक अनिलकुमार श्रीवास्तव, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, उपविभागीय अधिकारी सुनिल सूर्यवंशी, तहसिलदार रविंद्र चव्हाण, गटविकास अधिकारी एच.एस.मानकर, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, उपनगराध्यक्ष सुनिल पालांदूरकर, पं.स.सदस्य अंबुले, पं.स.माजी सभापती बंडू सोनेवाने, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, उमेश महतो उपस्थित होते.
या चित्ररथावर शिशु गटामध्ये ५० हजार रूपयांपर्यंतचे कर्ज, किशोर गटामध्ये ५० हजार ते ५ लाख रूपयापर्यंतचे कर्ज आणि तरूण गटामध्ये ५ लाख ते १० लाख रूपयापर्यंतचे कर्ज देण्यात येत असल्याचा संदेश लावण्यात आला होता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, योजनेचे स्वरूप, या कर्जासाठी कोणतेही आनुषांगीक शुल्क नाही, सवलतीची प्रक्रिया शुल्क, कमी व्याजदर, संयुक्तीक परतावा, कालावधी, मुद्रा कार्डद्वारे खेळते भांडवली कर्ज ही या कर्जाची मुख्य वैशिष्टे आहेत. मुद्रा कार्ड प्राप्त करा व आपला व्यवसाय वाढवा हा संदेशही या चित्ररथावर देण्यात आला. केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी १० मिनिटांची चित्रिफत, ३ आॅडिओ जिंगल्स या चित्ररथात असून अनेकांना या योजनेचा लाभ घेण्यास प्रवृत्त करण्यास हा आकर्षक चित्ररथ उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यात २४ दिवस हा चित्ररथ विविध गावात भ्रमण करणार आहे.
बसस्थानके, बँका, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाविद्यालय, महत्वाचे चौक, महत्वाची शासकीय कार्यालय, आठवडी बाजार, तालुक्यातील महत्वाच्या गावामध्ये जाणार आहे.
त्यामुळे बेरोजगार तरूण तरूणी, गरजू व्यक्ती व महिलांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेण्यास चित्ररथाची महत्वाची भूमिका राहणार आहे.(तालुका प्रतिनिधी)
 

Web Title: Launch of painting of Prime Minister Money Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.