अर्जुनीतून प्रधानमंत्री आवास योजनेचा शुभारंभ

By admin | Published: March 8, 2017 01:11 AM2017-03-08T01:11:40+5:302017-03-08T01:11:40+5:30

गोंदिया तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रथमच शुभारंभ ग्राम अर्जुनी येथून करण्यात आले.

Launch of Pradhan Mantri Awas Yojana from Arjuni | अर्जुनीतून प्रधानमंत्री आवास योजनेचा शुभारंभ

अर्जुनीतून प्रधानमंत्री आवास योजनेचा शुभारंभ

Next

विजेंद्र मेश्राम   खातिया
गोंदिया तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रथमच शुभारंभ ग्राम अर्जुनी येथून करण्यात आले. त्या योजनेचे उद्घाटन खंडविकास अधिकारी एस.व्ही. इस्कापे यांच्या हस्ते, सरपंच पृथ्वीराज रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने प्रल्हाद उके, तांत्रिक अधिकारी डी.झेड. लिल्हारे, यु.सी. धावडे, उपसरपंच सूर्यप्रकाश भगत, ग्रामपंचायत सदस्य शेखर शहारे, ग्रामसेवक माहुले, सेवा सोसायटी अध्यक्ष विजय रहांगडाले, हरिराम मेश्राम, जे.सी. तुरकर, पोलीस पाटील ओमप्रकाश शहारे व इतर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमांतर्गत खंड विकास अधिकारी एस.व्ही. इस्कापे यांनी सांगितले, अर्जुनी येथून प्रधानमंत्री आवास योजनेचे शुभारंभ करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये १२ लोकांचे आवास तयार करण्यात येत आहेत. शासनाचे या योजनेचा लाभ गरजू लोकांना मिळावा तसेच ज्या लोकांचे कच्चे घरे आहेत, त्या लोकांनाही या योजनेचा लाभ ग्रामपंचायत प्रशासनाने पाठविलेल्या नावाप्रमाणे देण्यात येतील. त्यांनी सांगितले की, शासनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा लाभ घेऊन आपण आपला व गावाचा विकास करू शकतो. त्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकांनी एकत्र येऊन गावाचा विकास कसा करावा, यावर विचारमंथन करून ध्येय गाठावे. युवा वर्गाने यासाठी समोर यावे, असे सांगितले.
संचालन माजी उपसरपंच जे.सी. तुरकर यांनी केले. आभार ग्रामसेवक माहुले यांनी मानले. कार्यक्रमासाठी ग्रा.पं. सदस्य शेखर शहारे, नितीन तुरकर, राजू राऊत, मनोज राऊत आदींनी सहकार्य केले.

 

Web Title: Launch of Pradhan Mantri Awas Yojana from Arjuni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.