विकेल ते पिकेल धोरणाअंतर्गत रयत बाजाराला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:27 AM2021-03-25T04:27:43+5:302021-03-25T04:27:43+5:30

गोंदिया तालुक्यात धाना व्यतिरिक्त भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. विकेल ते पिकेल धोरणा अंतर्गत तालुक्यातील शेतकरी गटामार्फत व ...

Launch of Rayat Bazaar under Vikel to Pickle policy | विकेल ते पिकेल धोरणाअंतर्गत रयत बाजाराला सुरुवात

विकेल ते पिकेल धोरणाअंतर्गत रयत बाजाराला सुरुवात

Next

गोंदिया तालुक्यात धाना व्यतिरिक्त भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. विकेल ते पिकेल धोरणा अंतर्गत तालुक्यातील शेतकरी गटामार्फत व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमार्फत ताजा व दर्जेदार भाजीपाला

विक्री शनिवारपासून पोलीस वसाहत कारंजा येथे सुरु करण्यात आली. काटी, बिरसोला, वडेगाव, अदासी, गुदमा,

तांडा, एकोडी, लोधीटोला येथील शेतकऱ्यांनी विविध प्रकारचा भाजीपाला, पपई, सेंद्रीय गुळ, लाकडी तेलघाणीवर

काढलेले जवस व सरसो तेल विक्रीकरीता ठेवले होते. पोलीस कर्मचारी वसाहतील ग्राहकांनी या बाजारातील

शेतमाल खरेदी करुन उत्तम प्रतिसाद दिला. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे, उपविभागीय कृषि अधिकारी भिमाशंकर पाटील, तालुका कृषि अधिकारी धनराज तुमडाम, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) सुनील खडसे यांनी सहभागी शेतकऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. सहभागी शेतकरी गटांना

सावलीसाठी छत्री तसेच बॅनर, पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा आत्मा विभागामार्फत पुरविण्यात आल्या.

रयत बाजार आयोजनासाठी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनील खडसे व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक शैलेश

बिसेन यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Launch of Rayat Bazaar under Vikel to Pickle policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.