रानभाज्या मानवी आरोग्याला उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:33 AM2021-08-12T04:33:07+5:302021-08-12T04:33:07+5:30

देवरी : आधुनिकतेकडे वाटचाल करीत असताना मानवी आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून, पारंपरिक आणि दुर्मीळ रानभाज्यांचा दैनंदिन आहारामध्ये समावेश करावा. ...

Legumes are good for human health | रानभाज्या मानवी आरोग्याला उपयुक्त

रानभाज्या मानवी आरोग्याला उपयुक्त

Next

देवरी : आधुनिकतेकडे वाटचाल करीत असताना मानवी आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून, पारंपरिक आणि दुर्मीळ रानभाज्यांचा दैनंदिन आहारामध्ये समावेश करावा. विविध औषधी रानभाज्या व वनउपज अन्न मानवी आरोग्यास उपयुक्त आहे. रानभाज्या सेवनामुळे मानवी शरीर सशक्त होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते, असे प्रतिपादन माजी जिप सदस्य उषा शहारे यांनी केले.

९ ऑगस्ट हा क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत तालुका कृषी विभाग देवरी यांच्या वतीने रानभाज्या महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी त्या बाेलत होत्या. या रानभाज्या महोत्सवास प्रमुख मार्गदर्शक म्हणून माविमच्या महिला मंडळाच्या महिला अध्यक्ष हेमलता वालदे, तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम, चिचगडचे मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी, देवरीचे मंडळ कृषी अधिकारी विकास कुंभारे, पालीवाल उपस्थित होते. रानभाज्या महोत्सवामध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त देवरी तालुक्यातील आदिवासीबहुल नक्षलग्रस्त भागातील एकूण ४० प्रकारच्या दुर्मीळ व औषधी रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते, तसेच प्रत्येक रानभाजीचे व वनउपज यांना स्वयंपरिचय फलक लावण्यात आले होते. जेणेकरून आदिवासी शेतकऱ्यांना आणि शहरी भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना रानभाज्यांची माहिती मिळावी आणि रानभाज्यांचे महत्त्व त्यांना समजावे, याची दक्षता घेण्यात आली. तालुका रानभाज्या महोत्सवामध्ये विविध रानभाज्यांचे नमुने ठेवण्यात आले होते, तसेच विक्रीसाठी स्टाॅल लावण्यात आले होते. तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम यांनी रानभाज्यांचे मानवी आहारातील महत्त्व विशद केले. मानवी आरोग्यास गुणकारी असून, शरीराची प्रतिकारशक्ती वाढून माणूस कोणत्या आजाराला बळी पडणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी व शहरात राहणाऱ्या नागरिकांनी रानभाज्या खरेदी करून दैनंदिन आहारामध्ये समावेश करण्याबाबत आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक शिवकुमार येडाम यांनी केले, तर आभार आत्मा विभागाचे अरविंद उपवंशी यांनी मानले.

........

जिल्ह्यात आढळणाऱ्या रानभाज्या

रानभाज्या पावसाळ्याच्या सुरुवातीला आढळून येत असून, औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. रानभाज्यांमध्ये कंदभाज्या- उदाहरणार्थ पातूर भाजी, उंदीरकानी, करांदे, वडघर, कडूकंद, कोणताही अळू इत्यादी. हिरव्या भाज्या- तांदुळजा, काटेमाठ कुडा, काकडा, कोरडा, कुर्डू, घोळ कवळा, लोथ, इत्यादी. फळभाज्या- उदा. कर्टुले, वाघेडी, चिचुर्डी, पायार, मोह, कपाळफोडी, काकड इत्यादी. फुलभाजी- कुडा, शेवळ, उळशी, तसेच विदर्भातील तरोटा, मोहफूल, कुडाच्या शेंगा वगैरे असंख्य रानभाज्या या भागांमध्ये आढळून येतात.

Web Title: Legumes are good for human health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.