चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:30 AM2021-08-23T04:30:47+5:302021-08-23T04:30:47+5:30

सडक अर्जुुनी : जनावरांसाठी चारा आणण्याकरिता गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी (दि. २२) सकाळी ...

A leopard attacks a farmer who goes to fetch fodder | चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

Next

सडक अर्जुुनी : जनावरांसाठी चारा आणण्याकरिता गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी (दि. २२) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सडक अर्जुनी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बकी गेटजवळ घडली. देवराम तुळशीराम गहाणे (४२, रा. कोसंबी) असे बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार देवराम हा रविवारी सकाळी शेतशिवारातून जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेला होता. दरम्यान, चारा घेऊन परत येत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात देवराम गंभीर जखमी झाले. बिबट्याच्या तावडीतून कशी बशी सुटका करून घेतली. गावात पोहोचून याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. देवराम यांच्यावर सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. कोसबी गावालगत नवेगाव - नागझिरा अभयारण्य लागून असल्यामुळे कोसबी, कोलारगाव, बकी, मेंडकी, कोसमघाट परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पाचभाई, वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार, सहवनक्षेत्र अधिकारी नरेंद्र वाढई, वनरक्षक आनंद बनसोड यांनी कोसबी येथे भेट देऊन माहिती घेतली. देवरामला वन विभागाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Web Title: A leopard attacks a farmer who goes to fetch fodder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.