विषप्रयोग करून बिबट्याची शिकार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:30 AM2021-05-12T04:30:18+5:302021-05-12T04:30:18+5:30

गोंदिया : विषप्रयोग करून बिबट्याची शिकार करण्यात आल्याची घटना सडक अर्जुनी तालुक्यातील सिंधीपार वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५५६ मध्ये मंगळवारी ...

Leopard hunting by poisoning () | विषप्रयोग करून बिबट्याची शिकार ()

विषप्रयोग करून बिबट्याची शिकार ()

Next

गोंदिया : विषप्रयोग करून बिबट्याची शिकार करण्यात आल्याची घटना सडक अर्जुनी तालुक्यातील सिंधीपार वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५५६ मध्ये मंगळवारी (दि. ११) सकाळी उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी वनविभागाने दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार, सडक अर्जुनी तालुक्यातील फुलेनगर येथील सुखनदास तोरणकर यांच्या गोऱ्ह्याची पाच-सहा दिवसांपूर्वी बिबट्याने शिकार केली होती. त्यांच्या शेतशिवारात नेहमीच बिबट्याचा वावर राहत हाेता. त्यामुळे त्यांनी शेताच्या परिसरात थिमेेट टाकले होते. हेच थिमेट एका गाईने खाल्ले. या गाईचे मांस बिबट्याने खाल्ल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. बिबट्याचा मृतदेह सडलेला असून त्याच्याजवळच एक जनावरसुध्दा मृतावस्थेत आढळले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक कुलराजसिंग, सहायक वनसंरक्षक प्रदीप पाटील व वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. संशयावरून सुखनदास तोरणकर व संदीप तोरणकर या दोघांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यांनी त्यांच्या गोऱ्ह्याची शिकार झाल्याने थिमेेट टाकल्याची कबुली वनविभागाच्या अधिकाऱ्यांजवळ दिल्याची माहिती आहे. मात्र मृत बिबट्याचे पंजे आणि अवयव गायब असल्याने विषप्रयोग करून बिबट्याची शिकार झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता बिबट्याची विषप्रयोग करून शिकार केल्याची शंका असल्याने त्या बाजूनेसुद्धा तपास सुरू असल्याचे सांगितले.

Web Title: Leopard hunting by poisoning ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.