बिबट्याने केले वासरू ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:30 AM2021-01-19T04:30:55+5:302021-01-19T04:30:55+5:30
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम राजोली येथील शेतकरी नीळकंठ शेंडे यांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या गायीचे वासरू बिबट्याने ठार केल्याची घटना ...
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम राजोली येथील शेतकरी नीळकंठ शेंडे यांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या गायीचे वासरू बिबट्याने ठार केल्याची घटना रविवारी रात्री १२ वाजतादरम्यान घडली. या घटनेनंतर गावात बिबट्यामुळे दहशत निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, शेंडे यांच्या घरचे सर्व सदस्य रात्री झोपेत असताना अचानक गोठ्यातून कसला तरी आवाज ऐकू आला. यामुळे शेंडे यांनी गोठ्याकडे जाऊन बघितले असता त्यांना बिबट वासरू घेऊन जाताना दिसला. आरडा-ओरड करून त्यांनी लोकांना जागे केले तेव्हा घराच्या शेजारीच वासरू बिबट्याने फस्त केल्याचे दिसले. या घटनेची माहिती वन विभागाला दिली असता क्षेत्र सहायक पठाण, वनरक्षक पी.बी. साखरे, व्ही.के. सोंडगिर, ए.एम. दाभोडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि नुकसान भरपाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. या घटनेंतर राजोलीसह परिसरात बिबट्यामुळे दहशत निर्माण झाली आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी तसेच बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेंडे व गावकऱ्यांनी केली आहे.