मोबाईल अ‍ॅपद्वारे रेल्वे तिकीट काढण्याकडे प्रवाशांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 09:29 PM2019-05-30T21:29:57+5:302019-05-30T21:31:33+5:30

प्रवाशांना ऐनवेळी रेल्वे तिकीट काढण्यासाठी धावपळ करावी लागू नये, यासाठी रेल्वे युटीएस प्रणालीव्दारे मोबाईलवर रेल्वे तिकिट काढण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. मात्र याला रेल्वे प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नसून २८ दिवसात केवळ २.०७ टक्के प्रवाशांनी मोबाईलव्दारे तिकीट काढले.

Lessons of passenger to get train tickets through mobile app | मोबाईल अ‍ॅपद्वारे रेल्वे तिकीट काढण्याकडे प्रवाशांची पाठ

मोबाईल अ‍ॅपद्वारे रेल्वे तिकीट काढण्याकडे प्रवाशांची पाठ

googlenewsNext
ठळक मुद्दे२८ दिवसात केवळ २ टक्के तिकीट विक्री : रेल्वेची युटीएस प्रणाली

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्रवाशांना ऐनवेळी रेल्वे तिकीट काढण्यासाठी धावपळ करावी लागू नये, यासाठी रेल्वे युटीएस प्रणालीव्दारे मोबाईलवर रेल्वे तिकिट काढण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. मात्र याला रेल्वे प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नसून २८ दिवसात केवळ २.०७ टक्के प्रवाशांनी मोबाईलव्दारे तिकीट काढले.त्यामुळे मोबाईल अ‍ॅपव्दारे रेल्वे तिकीट काढण्याकडे प्रवाशांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
हावडा-मुंबई मार्गावरील महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानक ओळखले जाते. या रेल्वे स्थानकावरुन दररोज दीडशेवर रेल्वे गाड्या धावत असून २० हजार प्रवाशी ये-जा करतात. रेल्वे स्थानकावर गाडीच्या वेळेवर पोहचणाऱ्या प्रवाशांची संख्या बºयाच प्रमाणात आहे. मात्र या प्रवाशांना वेळेवर तिकिट काढणे शक्य होत नसल्याने प्रवास करणाºयापासून वंचित राहावे लागते.
त्यामुळे प्रवाशांची ही अडचण दूर करण्यासाठी रेल्वेने मोबाईल अ‍ॅपव्दारे रेल्वे तिकीट उपलब्ध करुन देण्याची सुविधा सुरू केली. मात्र याला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
गोंदिया रेल्वे स्थानकावरुन १ ते २८ मे दरम्यान ५ लाख ८७ हजार ५१८ रेल्वे तिकीटांची विक्री झाली आहे. मात्र यापैकी मोबाईल अ‍ॅपव्दारे तिकीट काढणाºया प्रवाशांची संख्या १२ हजार १५९ एवढी आहे.त्याची टक्केवारी पाहिल्यास केवळ २.०७ टक्के आहे.
रेल्वे विभागाने गोंदिया रेल्वे स्थानकाला कमीत कमी ५ टक्के तिकीट मोबाईल अ‍ॅपव्दारे विक्री करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र अर्धेही उद्दिष्ट गाठण्यात रेल्वे विभागाला यश आले नाही.
पाच टक्कचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कमीत कमी २९ हजार ३७५ प्रवाशांनी मोबाईल अ‍ॅपव्दारे तिकीट काढण्याची गरज आहे. तरच गोंदिया रेल्वे स्थानकाला दिलेले उद्दिष्ट गाठणे शक्य आहे.

१३ मे रोजी सर्वाधिक तिकिटांची विक्री
मे महिन्यात लग्न सराईमुळे एसटीसह रेल्वे गाड्यांमध्ये सुध्दा प्रवाशांची गर्दी वाढली होती. तर गोंदिया रेल्वे स्थानकावरुन १३ मे रोजी सर्वाधिक २५ हजार ७२ तिकीटांची विक्री झाली. तर २८ मे रोजी केवळ १७ हजार ५१८ तिकीटांची विक्री झाली. या दोन्ही दिवसांची तुलना केल्यास १३ मे रोजीे सर्वाधिक तिकीटांची विक्री झाली आहे. यामुळे लग्न सराईमुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ झाली.
जनजागृतीचा अभाव
रेल्वे विभागाने रेल्वे प्रवाशांसाठी मोबाईल अ‍ॅपव्दारे रेल्वे तिकीट काढण्याची सुविधा सुरू केली. ही सुविधा अ‍ॅन्ड्राईड मोबाईल असणाऱ्यांसाठी आहे. मात्र मोबाईल अ‍ॅपव्दारे रेल्वे तिकीट कसे काढायचे याबाबत रेल्वे विभागाने कुठलीच जनजागृती केली नाही. त्याचा सुध्दा परिणाम मोबाईल अ‍ॅपव्दारे तिकीट विक्रीवर होत आहे. तर मोबाईल अ‍ॅपव्दारे तिकीट काढल्यानंतर ती परत करता येत नसल्याने सुध्दा याचा सुध्दा परिणाम होत आहे. त्यामुळे यातील काही त्रृटी दूर करुन जनजागृतीवर भर देण्याची गरज आहे.

Web Title: Lessons of passenger to get train tickets through mobile app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.