व्यावसायिक बदलानुसार विद्यार्थ्यांना धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:23 AM2019-01-19T00:23:11+5:302019-01-19T00:24:15+5:30

अभियांत्रिकीसह इतर पदव्या असूनही अनेक युवकांना बेरोजगार राहावे लागत आहे.आयटी क्षेत्रात सुध्दा दिवसेंदिवस अनिश्चिततेच वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमध्ये थोडे संभ्रमाचे वातावरण आहे.

Lessons for students by professional change | व्यावसायिक बदलानुसार विद्यार्थ्यांना धडे

व्यावसायिक बदलानुसार विद्यार्थ्यांना धडे

googlenewsNext
ठळक मुद्दे४९३ विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड : जिल्ह्यातील विविध उद्योगात संधी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अभियांत्रिकीसह इतर पदव्या असूनही अनेक युवकांना बेरोजगार राहावे लागत आहे.आयटी क्षेत्रात सुध्दा दिवसेंदिवस अनिश्चिततेच वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमध्ये थोडे संभ्रमाचे वातावरण आहे.विद्यार्थ्यांचा हा भ्रम दूर करुन त्यांना व्यावसायीक क्षेत्रातील नवीन बदलाचे धडे व प्रत्यक्षात त्याचा अनुभव घेता यावा, यासाठी येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाने पुढाकार घेतला आहे.यासाठी जिल्ह्यातील उद्योजक आणि शासकीय विभागांची मदत घेतली जात आहे.
अभियांत्रिकी,स्थापत्य तसेच तंत्रनिकेतन विद्यालयाचा डिप्लोमा असून देखील या विद्यार्थ्यांवर बेरोजगार राहण्याची अथवा पाच ते दहा हजार रुपयांच्या वेतनावर काम करावे लागते. तर आयटी क्षेत्रात दररोज नवे बदल आणि संशोधन केले जात आहे. या नवीन बदलांना जे आत्मसात करीत आहेत त्यांचा जॉब सुरक्षीत आहे. मात्र जे आत्मसात करु शकले नाही त्यांना नौकरी गमवावी लागत आहे. हीच बाब हेरून महाराष्टÑ राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळाने तंत्रनिकेतन विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्थानिक उद्योगांमध्ये व्यावसायीक प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मंडळाच्या सूचनेनुसार हब अ‍ॅन्ड स्पोकच्या धर्तीवर गोंदिया जिल्ह्यात याची सुरुवात करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील चार शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील विविध उद्योग आणि शासकीय विभागात प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यातंर्गत शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाचे प्राचार्य सी.डी.गोडघाटे यांनी ४९३ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. या विद्यार्थ्यांना विविध उद्योगाच्या ठिकाणी सहा आठवड्याचे व्यावसायीक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

१४ विभागांची समन्वय समिती
जिल्ह्यात अदानी विद्युत प्रकल्पासह येथील एमआयडीसीमध्ये विविध उद्योग आहे. या उद्योगांमध्ये तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना ६ आठवड्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच सिंचन, बांधकाम व इतर विभागांची सुध्दा यासाठी मदत घेतली जात आहे.प्राचार्य सी.डी.गोडघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली १४ विभागाच्या सदस्यांची समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे.अदानीचे स्टेशन हेड सी.पी.साहू हे या समितीचे सदस्य सचिव आहे.

तंत्रनिकेनत विद्यालयातून विद्यार्थी डिप्लोमा घेवून बाहेर पडल्यानंतर त्यांना रोजगार मिळण्याची व अनुभवाची कमरता जाणवू नये तसेच व्यावसायीक क्षेत्रात होणाऱ्या नवीन बदलांची माहिती मिळावी यासाठी विद्यार्थ्यांना सहा आठवड्याचे व्यावसायीक प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
- सी.डी.गोडघाटे
प्राचार्य तंत्रनिकेतन विद्यालय गोंदिया.

Web Title: Lessons for students by professional change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.