राष्टÑीयस्तराचे खेळाडू तयार करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 09:07 PM2017-09-26T21:07:51+5:302017-09-26T21:08:06+5:30
आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये विविध कलाकौशल्य व गुण आहेत. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना राष्टÑीय दर्जाचे खेळाडू बनविण्यासाठी अदानी प्रकल्पाद्वारे सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन अदानी प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक सी.पी.साहू यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये विविध कलाकौशल्य व गुण आहेत. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना राष्टÑीय दर्जाचे खेळाडू बनविण्यासाठी अदानी प्रकल्पाद्वारे सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन अदानी प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक सी.पी.साहू यांनी केले.
महाराष्टÑ शासनाद्वारे सुरू असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मजितपूर येथे पार पडल्या. या वेळी ते स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून अदानी प्रकल्पाचे नियोजन अधिकारी नितीन शिराडकर उपस्थित होते. शिराडकर म्हणाले, खेळामध्ये जीवनाचे रहस्य दडलेले आहे. त्याच्यात निरोगी जीवन व जीवनमान उंचावण्याचा मार्ग दडलेला आहे. खेळ हे समर्पित भावनेने खेळले पाहिजे तरच जीवनात यश मिळते, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
अध्यक्षस्थानी देवरी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी होते. अध्यक्षीय भाषणात चौधर यांनी, आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये खेळाची उच्चकोटीची क्षमता असते. दणकट व धडधाकड शरीरयष्टीचे विद्यार्थी असतात. केवळ त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. त्यांनी अदानी प्रकल्पाचे आभारही मानावे. याचे कारण म्हणजे मजीतपूर शाळा अदानीने दत्तक घेऊन भव्य मैदान तयार करुन दिलेले आहे. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील कला गुणांचा विकास होत असल्याचे सांगितले. क्रीडा स्पर्धेत क्रीडा ज्योत प्रज्ज्वलन करुन मान्यवरांच्या हस्ते क्रीडाध्वज फडकविण्यात आला. राष्टÑगीतानंतर प्रकल्पातील राज्यस्तरावर खेळलेले विद्यार्थी क्रीडा मशाल घेऊन मैदानाभोवती धावले. त्यानंतर खेळाडूंनी पथसंचालन करुन पाहुण्यांना मानवंदना दिली. क्रीडा स्पर्धेत धनुर्विद्या खेळाच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन सी.पी. साहू यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेसाठी क्रीडा प्रमुख विजय मेश्राम यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला सहायक प्रकल्प अधिकारी एल.एच. भोंगाडे, मिश्रा, टेंभुर्णीकर, प्रकल्प कार्यालयाचे सर्व कर्मचारी, विवेक नागभिरे, पी.जी. कळंबे, मुख्याध्यापक ए.आर. राऊत, एस.डी. बारसागडे, सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते. प्रास्ताविक विभागीय क्रीडा समन्वयक पी.जी. कोरांडे यांनी मांडले. संचालन एन.पी. सावळे यांनी केले. आभार मुख्याध्यापक डी.जी. कोलारे यांनी मानले.
हजारावर खेळाडूंचा सहभाग
देवरी प्रकल्पातील पुराडा, शेंडा, ककोडी, मजितपूर अशा एकूण ४ केंद्रांतील एकूण एक हजार २०० खेळाडू व ३८ क्रीडा शिक्षक क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत सांघिक मैदानी खेळ मुले व मलींची कबड्डी, खो-खो, व्हालीबॉल व वैयक्तिक खेळात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्या स्पर्धांमध्ये शेंडा केंद्र प्रथम व ककोडी केंद्राने द्वितीय क्रमांक मिळविले.