बोगस बी-बियाणे, खते व कीटकनाशकाची विक्री करणारे १० कृषी केंद्रांचे परवाने केले निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 01:10 PM2024-09-05T13:10:32+5:302024-09-05T13:11:53+5:30

कृषी विभागाची कारवाई: तपासणी मोहिमेदरम्यान आढळली अनियमितता

Licenses of 10 agricultural centers selling bogus seeds, fertilizers and pesticides suspended | बोगस बी-बियाणे, खते व कीटकनाशकाची विक्री करणारे १० कृषी केंद्रांचे परवाने केले निलंबित

Licenses of 10 agricultural centers selling bogus seeds, fertilizers and pesticides suspended

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
जिल्ह्यात खरीप हंगामाच्या कृषी सेवा केंद्र पार्श्वभूमीवर बोगस बी-बियाणे, खते व कीटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने ९ भरारी पथक स्थापन केली आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये २६ गुणनियंत्रण निरीक्षकांचा समावेश आहे. या गुणनियंत्रण निरीक्षकामार्फत कृषी केंद्राची अचानक तपासणीसाठी धडक मोहीम जिल्ह्यात राबविली जात आहे. याच मोहिमेदरम्यान नियमाचे उल्लघंन करणाऱ्या १० कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले.


कृषी केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नूतनीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे, रजिस्टरवरील साठा व प्रत्यक्ष साठा न जुळणे, विक्री करत असलेल्या कृषी निविष्ठांचे खरेदी बिल न ठेवणे, ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकाची सही न घेणे आदी कारणांमुळे १० निविष्ठाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. 


शेतकऱ्यांनी करावी तक्रार
कृषी सेवा केंद्रचालकांनी बियाणे, रासायनिक खतांची साठेबाजी व खताची लिकिंग केली अथवा जादा दराने खत विक्री केल्यास कायद्यांतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा त्यांना दिला आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्राकडून खते, बियाणे व कीटकनाशकांची खरेदी करावी. खरेदी करताना कृषी सेवा केंद्राकडून निविष्ठा खरेदीची पक्के बिले घ्यावे, त्यावरील नमूद एमआरपीप्रमाणे मालाची खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे, तसेच एमआरपीपेक्षा जादा दराने मालाची विक्री होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी.


या कृषी केंद्रावर कारवाई 
श्री गणेश कृषी केंद्र, पांढराबोडी, ता. गोंदिया- बियाणे परवाना १ महिन्या- करिता, 1. मॉ अंबे कृषी केंद्र, दासगाव, ता. गोंदिया- बियाणे परवाना ६ महिन्यां- करिता, किसान क्रांती कृषी सेवा केंद्र, बाह्मणी, ता. सडक अर्जुनी- बियाणे परवाना २ महिन्यांकरिता, नागपुरे अॅग्रो एजन्सी गोवारीटोला, ता. सालेकसा कीटकनाशके परवाना १ महिन्याकरिता, किसान सेवा कृषी केंद्र, झालिया, ता. सालेकसा- कीटकनाशके परवाना १ महिन्याकरिता, आरोही कृषी केंद्र, नवेझरी, ता. तिरोडा- कीटकनाशके परवाना १ महिन्याकरिता, यशोदा कृषी केंद्र, नवेझरी, ता. तिरोडा- कीटकनाशके परवाना २ महिन्यांकरिता, गुर्वेश ट्रेडर्स व कृषी सेवा केंद्र, धामणगाव, ता. आमगाव- कीटकनाशके परवाना ४ महिन्यांकरिता, येरणे कृषी केंद्र, ओवारा, ता. देवरी- खत परवाना ६ महिन्यां- करिता, ठाकरे कृषी केंद्र वडद, ता. आमगाव- खत परवाना २ महिन्यांकरिता निलंबित करण्यात आला.


या नियमाने होईल कारवाई 
बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, खत नियंत्रण आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५, नाशक कायदा १९६८, कीटकनाशके नियम १९७१ नुसार संबंधित कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आडसुळे यांनी कळविले आहे.
 

Web Title: Licenses of 10 agricultural centers selling bogus seeds, fertilizers and pesticides suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.