19 कृषी केंद्रांचे परवाने केले निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 05:00 AM2022-06-30T05:00:00+5:302022-06-30T05:00:02+5:30

खरीप हंगामा दरम्यान शेतकऱ्यांची बोगस बियाणे, खतांच्या नावावर फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने भरारी पथके व तपासणी माेहीम सुरू केली आहे. मात्र, त्यानंतरही जिल्ह्यात बोगस बियाणे आणि खतांची विक्री केली जात असल्याचा प्रकार देवरी आणि गोंदिया कृषी विभागाने केलेल्या कारवाईनंतर स्पष्ट झाले आहे. 

Licenses of 19 agricultural centers suspended | 19 कृषी केंद्रांचे परवाने केले निलंबित

19 कृषी केंद्रांचे परवाने केले निलंबित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र राज्यात १ नोव्हेंबर २०१७ पासून अनुदानित खते विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण योजना सुरू करण्यात आली आहे. खरीप हंगामात  टॉप-२०  युरिया  बायर खरेदीदार गैरप्रकारासंदर्भात जिल्ह्यातील श्रीनाथ कृषी केंद्र ठाणा (ता. आमगाव), विनायक फर्टिलायजर कामठा (ता. गोंदिया), श्याम कृषी केंद्र एकोडी (ता. गोंदिया) या तीन कृषी केंद्रांचे परवाने तीन महिन्यांकरीता निलंबित केले. 
सम्यक कृषी केंद्र सोनबिहारी (ता.गोंदिया), जय किसान कृषी केंद्र बनाथर ( ता. गोंदिया), हिंदुस्थान ॲग्री क्लिनिक कुडवा (ता. गोंदिया), अंश कृषी केंद्र चुटिया (ता.गोंदिया), केवलराम कृषी केंद्र चुटिया (ता. गोंदिया), सेंट्रल कृषक सहकारी संस्था कटंगी (ता. गोंदिया), श्री गणेश कृषी केंद्र पांढराबोडी (ता. गोंदिया) या सात कृषी केंद्रांचे परवाने १५ दिवसांकरीता निलंबित करण्यात आले आहे. 
मालती कृषी केंद्र ब्राह्मणी (ता.सालेकसा), राजेंद्र उपराडे कृषी केंद्र दशरथटोला ब्राह्मणी (ता. सालेकसा), नागपुरे कृषी केंद्र पठानटोला (ता. सालेकसा) या तीन कृषी केंद्राची पुनश्च: सुनावणी २९ जून ,लावून कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली. 

भरारी पथकाची नजर तरीही खते बियाण्यांचा काळाबाजार 
- खरीप हंगामा दरम्यान शेतकऱ्यांची बोगस बियाणे, खतांच्या नावावर फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने भरारी पथके व तपासणी माेहीम सुरू केली आहे. मात्र, त्यानंतरही जिल्ह्यात बोगस बियाणे आणि खतांची विक्री केली जात असल्याचा प्रकार देवरी आणि गोंदिया कृषी विभागाने केलेल्या कारवाईनंतर स्पष्ट झाले आहे. 

 या सहा कृषी केंंद्रांना दिली सक्तीची ताकीद

- खरीप हंगाम २०२२ मध्ये शेतकऱ्यांना योग्य दर्जाचे बियाणे व रासायनिक खते मिळण्याकरीता जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्री केंद्राची तपासणी करण्याची कार्यवाही जिल्ह्यातील निरीक्षकांमार्फत करण्यात आली. त्यानुसार कृषी केंद्र सलंगटोला (ता. सालेकसा), किसान कृषी केंद्र चिकित्सालय साखरीटोला (ता. सालेकसा), राऊत कृषी केंद्र साखरीटोला (ता. सालेकसा), ओम साई कृषी केंद्र मुंडीपार (ता.गोरेगाव), शेतकरी कृषी सेवा केंद्र (ता.सडक अर्जुनी), मानकर कृषी सेवा केंद्र देऊटोला (ता. गोरेगाव) या सहा कृषी केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.

नऊ कृषी केंद्र सुरुच झाले नाही 
- कृषी केंद्राचे परवाने घेऊनसुद्धा आजपावेतो कृषी केंद्र सुरू न केल्यामुळे व व्यवहार न केल्यामुळे ९ कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात येत आहे. 

खतांची साठेबाजी करणे, खतांचा काळाबाजार करणे किंवा अनुदानित खते परराज्यांत विक्री करणे आदी प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित विक्रेत्यांचा परवाना कीटकनाशक कायदा १९६८ व खत नियंत्रण आदेश १९८३ तसेच बियाणे कायदा १९६६ अंतर्गत निलंबित करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 
- हिंदुराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

Web Title: Licenses of 19 agricultural centers suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.