आंभोऱ्याजवळ कालवा झाला लिकेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 09:29 PM2018-04-12T21:29:04+5:302018-04-12T21:29:04+5:30

शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याद्वारे डांर्गोली पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जात आहे. मात्र सालेकसा तालुक्यातील आंभोरा गावाजवळ कालवा लिक झाल्याने पुजारीटोला धरणाचे गेट गुरूवारी बंद करण्यात आले.

Liechage had a canal near the ground | आंभोऱ्याजवळ कालवा झाला लिकेज

आंभोऱ्याजवळ कालवा झाला लिकेज

Next
ठळक मुद्देपाणीटंचाईची समस्या तीव्र : शहरवासीयांच्या वाट्याला आठ दिवसांची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याद्वारे डांर्गोली पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जात आहे. मात्र सालेकसा तालुक्यातील आंभोरा गावाजवळ कालवा लिक झाल्याने पुजारीटोला धरणाचे गेट गुरूवारी बंद करण्यात आले. त्यामुळे शहवासीयांना पुन्हा आठ दिवस पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत डांर्गोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रालगत उभारलेल्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र यावर्षी वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडल्याने त्याचा पाणीपुरवठा योजनेवर परिणाम झाला. मागील महिनाभरापासून शहरवासीयांना केवळ दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा केला जातो. मात्र मागील तीन चार दिवसांपासून तो देखील बंद झाला. त्यामुळे शहरात पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर उशिरा जागे झालेल्या जिल्हा प्रशासन आणि मजीप्राने पुजारीटोला धरणातून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला.
यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याव्दारे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू केले. मंगळवारी (दि.१०) पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यात आले. मात्र हे पाणी धरणापासून ४० कि.मी.अंतरावर असलेल्या आंभोरा गावाजवळ पोहचल्यानंतर कालवा लिकेज झाल्यामुळे दुसरीकडे वळले. तसेच पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला. त्यामुळे गुरूवारी (दि.१२) पुजारीटोला धरणाचे गेट बंद करुन कालवा दुरूस्तीचे काम सिंचन विभागाने सुरू केले.
कालव्याला चांगले मोठे भगदाड पडले असून दुरूस्तीचे काम दोन तीन दिवस चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पाणी पोहचण्यास किमान आठ दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी शहरवासीयांना पुन्हा आठ ते दहा दिवस पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
सिंचन विभागाकडे बोट
आंभोरा गावाजवळ कालवा लिकेज झाल्यानंतर दुरूस्तीची जबाबदारी सिंचन विभागाकडे सोपविण्यात आली. कालव्याची दुरूस्ती किती दिवसात होईल आणि पाणी सोडण्यात येईल अशी विचारणा मजीप्राच्या अधिकाºयांना केली असता त्यांनी सिंचन विभागाकडे बोट दाखविले. तर सिंचन विभागाच्या अभियंत्याला यासंदर्भात विचारले असता त्यांनी यावर बोलणे टाळले. त्यामुळे कालवा लिकेजची समस्या गंभीर असल्याची माहिती आहे.
ढिसाळ नियोजनाचा फटका
शहरात यंदा पाणी टंचाई निर्माण होणार ही बाब महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाला चांगलीच ठाऊक होती. मात्र जेव्हा शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला तेव्हाच या दोन्ही विभागाने पुजारीटोला धरणातून पाणी आणण्यासाठी धडपड सुरू केली. पुजारीटोला धरण ते डांगोर्ली पाणी पुरवठा योजना हे ९० कि.मी.चे अंतर असून ज्या कालव्याव्दारे हे पाणी आणले जाणार होते त्या कालव्यांची स्थिती योग्य आहे का? याची सुध्दा पाहणी करणे या दोन्ही विभागांना गरजचे वाटले नाही. आंभोरा गावाजवळ कालवा लिक झाल्यानंतर या विभागाला पाहणी करण्याची जाग आली. एकंदरीत या दोन्ही विभागांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका शहरवासीयांना बसत आहे.
मजीप्रा म्हणते शहरात पाणीटंचाई नाही
शहरातील जवळपास सर्वच भागात पाणी पुरवठा होत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. तसेच सकाळच्या सुमारास सार्वजनिक विहिरी आणि बोअरवेलवर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी पाहल्यानंतर शहरातील पाणी टंचाईची तीव्रता जाणविते. मात्र यासंदर्भात मजीप्राचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांच्याशी संपर्क साधला असता शहरातील सर्वच भागात सुरळीतपणे पाणी पुरवठा होत असल्याचा दावा केला.

Web Title: Liechage had a canal near the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.