प्रेम प्रकरणाची बदनामी गावात करेल म्हणून तरूणाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

By नरेश रहिले | Published: December 29, 2023 06:10 PM2023-12-29T18:10:29+5:302023-12-29T18:14:04+5:30

गोंदिया : गावातील एका मुलीवर आरोपीचे असलेले प्रेमसंबध मृतकाला माहीत होते. तो माझी गावात बदनामी करेल ह्या भीतीपोटी त्याने तरूणाचा ...

Life imprisonment for the accused who killed a young man because he would defame the love affair in the village | प्रेम प्रकरणाची बदनामी गावात करेल म्हणून तरूणाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

प्रेम प्रकरणाची बदनामी गावात करेल म्हणून तरूणाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

गोंदिया: गावातील एका मुलीवर आरोपीचे असलेले प्रेमसंबध मृतकाला माहीत होते. तो माझी गावात बदनामी करेल ह्या भीतीपोटी त्याने तरूणाचा चाकूने मारून खून केला. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. ही सुनावणी २९ डिसेंबर रोजी जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश एन.बी.लवटे यांनी केली आहे. आरोपी निखिल ओमप्रकाश खिरेकर (२०) रा. पुरगाव ता. गोरेगाव जि. गोंदिया याला भादंविचे कलम ३०२ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

आरोपी निखिल ओमप्रकाश खिरेकर याचे पुरगाव येथील एकामुली सोबत प्रेमसंबंध होते. या प्रकरणाची माहिती सुशिल योगराज पारधी (१९) रा. पुरगाव याला होती. सुशील गावात बदनामी करेल म्हणून आरोपी निखिल खिरेकर शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या सुशील पारधी याच्या गळयावर, छातीवर, पाठीवर, मानेवर चाकूने वार करून ठार केले. ही घटना २६ एप्रिल २०२१ रोजी घडली. आरोपीला मदत करण्यासाठी रोहीत राजेंद्र राहूलकर (१९) व आरोपी सागर संजय मेश्राम (१९) दोन्ही रा. पुरगाव हे देखिल गुन्हात सहभागी होते. मृतकची बहिन सुनिता योगराज पारधी ही जेव्हा ती शेतावर कपडे वाळविण्यासाठी गेली होती तेव्हा त्यांनी आरोपींना पाहिले होते. २७ एप्रिल २०२१ रोजी तिने आरोपींविरूध्द पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण येथे तक्रार केली.

गोंदिया ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ३०२,३४ अंतर्गत गुन्हा नोंदविला होता. तत्कालीन उपविभागीय पोलीस आधिकारी जगदीश पांडे यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. आरोपीचे वकील व सरकारी वकील महेश चंदवानी यांच्या सविस्तर युक्तीवादानंतर कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय अहवाल या आधारावर तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ सत्र न्यायाधीश एन. बी. लवटे यांनी आरोपीविरूध्द सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून एकाला जन्मठेप तर दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात पैरवी कर्मचारी सहाय्यक फौजदार आत्माराम टेंभरे यांनी काम पाहिले.

१६ साक्षदारांची नोंद
या प्रकरणात आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील तथा सरकारी अभियोक्ता महेश चांदवानी व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता कृष्णा पारधी यांनी एकुण १६ साक्षदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदवून घेतली.

यांची झाली निर्दोष मुक्तता
सुशिल योगराज पारधी (१९) रा. पुरगाव याच्या खून प्रकरणात भादंविचे कलम ३०२ अतंर्गत एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तर रोहीत राजेंद्र राहूलकर (१९) व सागर संजय मेश्राम (१९) दोन्ही रा. पुरगाव यांना पुराव्या अभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Web Title: Life imprisonment for the accused who killed a young man because he would defame the love affair in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.