आयुष्य लॉक; पेट्रोलची दरवाढ अनलॉक! (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:28 AM2021-05-14T04:28:41+5:302021-05-14T04:28:41+5:30
गोंदिया : पेट्रोल व डिझेलच्या किमतीत गेल्या तीस वर्षांत लिटरमागे ८३ रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम दररोजच्या ...
गोंदिया : पेट्रोल व डिझेलच्या किमतीत गेल्या तीस वर्षांत लिटरमागे ८३ रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम दररोजच्या महागाईवर होत आहे. सर्वसामान्यांना जीवन जगताना कसरत करावी लागत आहे. गेल्या तीस वर्षांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये प्रतिलिटर पेट्रोलमध्ये दरवाढ तब्बल ९८.५० रुपयांनी झाली आहे. फक्त पेट्रोलच्या किमतीतच वाढ झाली नाही, तर डिझेलही महाग होत असल्याने वाहतूक व्यवस्थाही महागली आहे. त्याचा परिणाम भाजीपाल्याचे दर, फळांचे दर, गॅस दरवाढ, किराणा व्यवसाय या सर्वच गोष्टींवर दिसून येत आहे. पूर्वी सरकार पेट्रोल व डिझेल एक ते दीड महिन्याच्या फरकाने दरवाढ करीत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्याने तेल कंपन्यांनी प्रचंड भाववाढ केली आहे. त्यामुळे सरकारकडून प्रति लिटर पेट्रोलमागे दोन ते पाच रुपये दरवाढ केली जात आहे. दरवाढीचा निर्णय होताच सामान्य नागरिक तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते सरकार विरोधात आंदोलन करीत असत. मात्र, अलीकडील काही दिवसांत मात्र ही आंदोलने होताना दिसत नाहीत. सातत्याने होणारी भाववाढ लक्षात घेता सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे. पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये दरवाढ होत आहे.
.....
पेट्रोल दरवाढ (प्रतिलिटर)
सन १९९१ - १५.६२
सन २००१ - २९.७०
२०११ - ५९. ६०
२०२० - ८१. २९
मे २०२१- ९८.९५
.........
पुन्हा सायकलवर फिरावे लागणार, मात्र अलीकडे पेट्रोल, डिझेलची झालेल्या प्रचंड दरवाढीचा परिणाम महागाईवर होत आहे. यापूर्वी सरकार एक ते दीड महिन्याने पेट्रोल व डिझेलची दरवाढ करीत होते. दरवाढ ही ग्राहकांना समजत होती. त्यावर तात्काळ सर्वसामान्यांसह राजकीय पक्षांचे कार्यकर्ते दरवाढ मागे घेण्यासाठी आंदोलने करत होते. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना सायकलवरच फिरावे लागेल.
- डॉ. भरतलाल हुकरे, माजी सरपंच, पदमपूर
........
एकीकडे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत. त्यामुळे दुसरीकडे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. डिझेलच्या किमती वाढल्याने वाहतूक व्यवसायासह बोरवेल, शेती व्यवसायासाठी मशागतीचे दरही प्रचंड वाढले आहेत. मात्र, त्या तुलनेत शेतीमालाला भाव वाढत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत.
जगदीश चुटे, महासचिव, ओबीसी विभाग जिल्हा काँग्रेस कमिटी गोंदिया.
..........
सरकारने सर्वसामान्यांचे हित लक्षात घेता सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे. लोकांना जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. एवढी दरवाढ होत असतानाही ग्राहक मात्र संयमीच असल्याचे दिसत आहे. कोणीही सरकारविरोधात निदर्शने, आंदोलने करताना दिसून येत नाहीत. मात्र, या दरवाढीचा फायदा सरकारला होत असून, सायकलवर फिरले तरी पेट्रोलच्या दरवाढीचा परिणाम महागाईवर झाला आहे.
-ग्यानीराम ठाकरे, सामाजिक कार्यकर्ता, पदमपूर
..................
तेलाच्या किमती
केंद्र शासनाचा ३६ ते ४० रुपयांपर्यंत पेट्रोलवर टॅक्स आहे. त्यातल्या त्यात दररोज किंमत बदलाचा निर्णय हा चुकीचा आहे. निवडणुकीच्या वेळी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत नाही हे मोठे गौडबंगाल आहे. निवडणूक संपताच लगेच तिसऱ्या दिवशीपासून पेट्रोल व डिझेलचे दर वाढून केंद्र सरकारने आपला चेहरा दाखविला. कच्च्या मालाच्या किमतीपेक्षा टॅक्स अधिक आहे, असे तिरोडाचे पेट्रोलपंप संचालक मुकेश अग्रवाल म्हणाले.