जिल्हा सत्रन्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:18 AM2021-07-24T04:18:27+5:302021-07-24T04:18:27+5:30
गोंदिया : पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या पतीला जिल्हा सत्रन्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला आरोपीने मुंबई उच्च ...
गोंदिया : पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या पतीला जिल्हा सत्रन्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. परंतु जिल्हा सत्रन्यायालयाने ठोठावली शिक्षा उच्च न्यायालयानेही कायम ठेवली आहे.
आमगाव तालुक्यातील ग्राम कातुर्ली येथील आरोपी राजकुमार भुरेलाल चौधरी (३५) याने पत्नी भूमा ऊर्फ रंजिता चौधरी हिला ७ मे २०११ रोजी गंभीर मारहाण केली होती. नंतर दोराने गळा आवळून तिचा खून केला होता. या प्रकरणात जिल्हा सत्रन्यायालयाने २१ मार्च २०१७ रोजी खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे राजकुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जिल्हा सत्रन्यायालयात सरकारी वकील म्हणून ॲड. क्रिष्णा पारधी यांनी काम पाहिले होते. मात्र आरोपीने त्या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. ते आव्हान गुणवत्ताहीन ठरवून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ते अपील फेटाळले. यामुळे राजकुमार चौधरीची जन्मठेपेची शिक्षा कायम केली आहे.
ही सुनावणी न्यायमूर्ती विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी केली आहे. पत्नीसोबत ८ वर्षे संसार केल्यानंतर त्याने तिचा खून केला होता, अशी माहिती ॲड. पारधी यांनी दिली आहे.