एकाच आठवड्यात पाईपलाईन झाली ‘लिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 10:25 PM2018-04-11T22:25:09+5:302018-04-11T22:25:09+5:30

चान्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याची तीव्र समस्या भेडसावत होती. त्यामुळे बोअरवेलमधून पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आठवडाभरातच पाईप लाईन लिक झाल्याने हा प्रयत्न फसला.

'Lik' gets pipeline in one week | एकाच आठवड्यात पाईपलाईन झाली ‘लिक’

एकाच आठवड्यात पाईपलाईन झाली ‘लिक’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : चान्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याची तीव्र समस्या भेडसावत होती. त्यामुळे बोअरवेलमधून पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आठवडाभरातच पाईप लाईन लिक झाल्याने हा प्रयत्न फसला.
पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेवून आरोग्य विभागाच्या वतीने लाखो रुपये मिळविण्यासाठी तालुक्यातील २ जि.प. सदस्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. मोठ्या घाई गर्दीने गावातील अंगणवाडी केंद्राजवळच्या बोअरवेल मधून पाईप लाईनच्या माध्यमातून पीएचसीमधील विहिरीमध्ये पाणी टाकण्याचे युद्धस्तरावर काम करुन पाणी टंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. वर्तमानपत्रात बातमी देऊन कामाचा श्रेय लाटण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र पाईप लाईन टाकून एक आठवडा होत नाही तर त्या पाईप लाईनला भगदाड पडून पाण्याचा अपव्यय होणे सुरु झाले. लाखो रुपयांचा निधी येवून एकाच आठवड्यात पाईप लाईन लीक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्ष जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, सह अध्यक्ष जि.प. सदस्य किशोर तरोणे आहेत. मागील काही वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांनी वाणवा आहे. एका अस्थायी वैद्यकीय अधिकाºयांच्या भरवशावर प्राथमिक आरोग्य केंद्राचा डोलारा सुरु आहे. मागील काही दिवसांपूर्वी एक वैद्यकीय अधिकारी रूजू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी मात्र त्यांनी कार्यभार सांभाळत रुग्णांना सेवा देण्याची जबाबदारी स्वीकारली नसल्याचे चित्र आहे.
कर्मचाºयांची पूर्तता करण्यास दुय्यम स्थान देवून लाखोंचा निधी मिळविण्यात पदाधिकाºयांनी सरसी घेतली. गावातील अंगणवाडी क्रमांक २ मध्ये असलेल्या बोअरवेलमधून अंदाजे ७०० मीटर पाईप लाईन टाकून प्राथमिक आरोग्य केंद्रातील विहिरीमध्ये पाणी टाकण्याचे काम करुन संबंधित पदाधिकाऱ्यांनी पाणी टंचाई सोडविण्याचा प्रयत्न केला. पाणी पुरवठा होऊन आठवडा होत नाही तोच नव्या पाईप लाईनला भगदाड पडून पाण्याचा अपव्यय होत आहे.
बिरसू पुराम यांच्या घरासमोरुन पाईप लाईन गेली आहे. त्याच ठिकाणी ती लीक झाली. विद्युत पुरवठा सुरु केल्यावर सर्व पाणी आतमधील पाईपमधून वर येवून रस्त्यावर पसरल्याचे चित्र दिसत आहे. एवढ्या लवकर पाईप लाईन ‘लिक’ झाली कशी, हा प्रश्न पुढे येत आहे. निधी खर्च करुन विहिरीमध्ये पाणी टाकण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरले. दरम्यान पाईपमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याने पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: 'Lik' gets pipeline in one week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.