वन तस्करांचे साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 09:18 PM2019-06-28T21:18:30+5:302019-06-28T21:18:43+5:30
तालुक्यात येत असलेल्या शेंडा गावाजवळील पुतळी परिसरात शुक्रवारी (दि.२७) रात्री देवरी पोलीस गस्तीवर असताना वन तस्करांचे साहित्य जप्त करण्यात त्यांना यश आले आहे. मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी जंगलात पळून गेले असून वन विभाग आरोपींच्या शोधात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : तालुक्यात येत असलेल्या शेंडा गावाजवळील पुतळी परिसरात शुक्रवारी (दि.२७) रात्री देवरी पोलीस गस्तीवर असताना वन तस्करांचे साहित्य जप्त करण्यात त्यांना यश आले आहे. मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी जंगलात पळून गेले असून वन विभाग आरोपींच्या शोधात आहे.
सडक-अर्जुनी वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत शेंडा सह वन विभागांतर्गत पुतळी जवळील कंपार्टमेंट क्रमांक १५७७ मध्ये शुक्रवारी (दि.२८) रात्री ३ वाजता देवरी पोलीस गस्त करीत होती. याप्रसंगी त्यांना जंगलाच्या दिशेने एक लाईट दिसल्याने पोलीस जंगलात शिरले. पोलिसांना बघून तस्कर टाटा पिक अप वाहन क्रमांक एमएच ३५- के ५५०३ गाडी सोडून जंगलात अंधाराचा फायदा घेत पसार झाले. सदर प्रकरण सडक-अर्जुनी वनविभागाकडे सुपुर्द करण्यात आले.
माहिती मिळताच फिरते पथक गोंदियाच्या वनअधिकारी स्नेहल म्हैसकर, सहायक वन अधिकारी एम. आर. शेख, शेंडा चे सहवनक्षेत्र अधिकारी शैलेश पारधी, सडक-अर्जुनीचे प्रभारी परीक्षेत्र अधिकारी सुनील खांडेकर, क्षेत्र सहायक प्रमोद फुल, वनरक्षक विनीत बडोले, शिवा तांडेकर, अरविंद बडगे, विलास गौतम, दिलीप माहुरे, नरेश पथोडे, एस. सी. बघेले, वनमजूर नाजूक मेंढे, देवानंद कोजबे, इळपाचे आदिंनी घटनास्थळ गाठले.
सदर घटनेचा तपास करून पिक अप गाडी , सागवान लाकडे व साहित्य जप्त करण्यात आले आहे. गाडीतील एका झाडाची गोलाई १८६ सेमी. असून किंमत अंदाजे ३१ हजार ६८५ रु पये तर गाडीची किंमत अंदाजे ८० हजार रु पये असून सदर माल जप्त करण्यात आला आहे.