५६३७ लोकांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2017 12:16 AM2017-06-15T00:16:32+5:302017-06-15T00:16:32+5:30

नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी केंद्र सरकारतर्फे राजीव गांधी जीवनदायी योजना सुरु करण्यात आली.

Lives of 5637 people | ५६३७ लोकांना जीवनदान

५६३७ लोकांना जीवनदान

googlenewsNext

 जीवन फुलले : राजीव गांधी जीवनदायी योजनेतून उपचार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी केंद्र सरकारतर्फे राजीव गांधी जीवनदायी योजना सुरु करण्यात आली. या योजनेला आता महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य योजनेच्या नावाने चालविण्यात येत आहे. मागील साडे तीन वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ५ हजार ६३७ लोकांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
गोंदिया जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत ३१ नोव्हेंबर २०१३ ते ३१ मे २०१७ दरम्यान १५ हजार ५५८ कुटूंबाचे कार्ड तयार करण्यात आले. या अंतर्गत ४६ हजार ३४७ लाभार्थ्यांचा समावेश आहे. अंत्योदय कार्डामध्ये २२१, अन्नपूर्णा ८, केशरी रंगाचे ९ हजार ३९३ व पिवळ्या रंगाचे ५ हजार ९३६ कुटूंबाचा समावेश आहे. जिल्ह्याच्या ५हजार ६३७ लाभार्थी रेशन कार्डात ७ हजार ९०७ लोकांना जिल्हा व जिल्ह्याबाहेर आरोग्य सेवेचा लाभ घेण्यात येईल. या योजनेअंतर्गत गोंदिया जिल्हा व बाहेरील जिल्ह्यातील ज्या रुग्णालयामध्ये ही सेवा दिली जाते. त्या रुग्णालयांना आतापर्यंत १६ कोटी ७० लाख ५५ हजार ७७५ रुपये देण्यात आले आहे. हृदयरोग, मेंदूरोग, कर्करोग व इतर आजारावर उपचार केला जातो. गोंदिया जिल्ह्यातील ३ हजार १३९ लाभार्थ्यांचे ३ हजार ६८८ प्रकरण मंजूर करण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्यात ज्या रुग्णालयांनी उपचार केला त्यांना ५ कोटी ४९ लाख ९३ हजार ९५० रुपये देण्यात आले आहे. जखमी, गर्भाशय, अपेडीक्स, अल्सर, पथरी, अशा आजारांचा उपचार करण्यात आला.

९७२ आजारांवर उपचार
दारिद्रय रेषेखालील जीवन जगणाऱ्या गरीब कुटूंबाना सेंद्रीय कार्ड धारकांना राजीव गांधी जीवनदायी योजना (महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य योजना) योजनेचा लाभ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय व महिला जिल्हा रुग्णालयात देण्यात येते. या योजनेअंतर्गत ९७२ उपचार, थेरेपी, २१२ शस्त्रक्रिया व ३० विशेष श्रेणीचा समावेश आहे. कुटूंब प्रमुखांच्या नावाने तयार करण्यात येणाऱ्या कार्डावर मोफत उपचार केला जातो. यासाठी रुग्णालयात टोल फ्री नंबर व आरोग्य मित्र ठेवण्यात आले आहेत.
ग्रामीण भागात जनजागृती
शासनातर्फे गरीब गरजूंना आरोग्याची सुविधा देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. परंतु ग्रामीण भागातील अनेक लोक या योजनेपासून अनभिज्ञ आहेत. माहिती अभावी खूप कमी लोकांनी आपले कार्ड तयार केले आहेत. गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त असूनही गरीब गरजूंना याचा लाभ मिळावा यासाठी प्रचार प्रसार करणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत वर्षभरात कुटूंबातील कोणतेही सदस्यासाठी दिड लाख रुपयापर्यंतचा उपचार करण्याची मुभा आहे. नामवंत कंपन्यानी या योजनेत सहभाग घेतला आहे. किडणी प्रत्यारोपणासाठी अडीच लाखापर्यंत मर्यादा आहे. ही योजना मोफत आहे. उपचार व औषधी, भोजन व घरापासून रुग्णालयापर्यंत पोहचण्याची व्वयस्था तसेच उपचारानंतर १० दिवस मोफत औषधी देण्याचे प्रावधान आहे.
डॉ. स्मीता घरडे,
जिल्हा समन्वयक गोंदिया

 

Web Title: Lives of 5637 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.